दक्षिण कोरिया : कोरोनाची सतर्क हाताळणी (South Korea : Prompt Action Against Corona)

 

दक्षिण कोरिया हा पूर्व आशियातील छोटा देश. तो चीनच्या दक्षिणेला आहे. कोरियन  द्वीपकल्पाचे विभाजन दुसऱ्या महायुद्धानंतर, 1945 साली झाले. त्यातून दोन देश जन्माला आले -उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. त्यांनी हिरवेगार डोंगर, चेरीच्या बागा, सागर किनारा व अनेक सुंदर बेटे ही नैसर्गिक संपत्ती खूप छान जोपसली. कोरियाची लोकसंख्या सव्वा पाच कोटी आहे. सेऊल ही दक्षिण कोरियाची राजधानी. प्राचीन बौध्द मंदिरे व अर्वाचीन हायटेक प्रगती यांचा सुंदर संगम तेथे झाला आहे.
          दक्षिण कोरियात कोरोनाची पहिली केस19 जानेवारी 2020ला निदर्शनास आली. सरकारी यंत्रणा कार्यक्षम असल्याने त्यांनी लागलीच दक्षता घेण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या जवळ जवळ एक महिन्यात 18 फेब्रुवारी 2020पर्यंत तीस केसेस होत्या व सर्व नियंत्रणात आहे याचे सरकारला समाधान होते. परंतु 19 फेब्रुवारी रोजी केस नंबर 31अॅडमिट झाली व त्या बाईंमुळे सगळेच चित्र पालटले. त्यानंतरच्या दहा दिवसातेवीसशे केसेसची नोंदणी  झाली. झाले असे, की त्या बाई त्याआधी दोन अतिजनवस्तीच्या शहरांतून फिरून आल्या होत्या. त्यातील एक होते सेऊल व दुसरे डेगू. त्यानंतर एक छोटासा अपघात झाल्यामुळे त्या इस्पितळात अॅडमिट झाल्या व त्यांच्या अंगात ताप असताना त्या तेथून बाहेर पडून दोन वेळेस चर्चमध्ये दर्शन घेऊन आल्या. त्यानंतर चाचणीच्या अहवालात त्यांना कोविद-19 झाल्याचे कळले. तोवर त्या जेथे जेथे गेल्या तेथे संसर्ग झाल्याने रोगाची लागण झाली. केवळ त्या एका चर्चमध्येच शंभर रोगी निघाले. हा हा म्हणता संख्या तेवीसशेवर जाऊन पोचली. परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ नये म्हणून मग सरकारने टेस्टिंग वाढवले. मार्च अखेरपर्यंत साडेतीन लाख लोकांचे टेस्टिंग झाले होते; म्हणजे दर दीडशे माणसांपाठी एक असे ते प्रमाण होते.
          सरकारने टेस्टिंगवर भर दिला, कारण MERS हा संसर्गजन्य रोग 2015 साली जेव्हा झाला होता तेव्हा मध्य पूर्वेकडील त्या रोगाची लागण मध्य पूर्व वगळता दक्षिण कोरियात सर्वात जास्त झाली होती. तेव्हाही जास्तीत जास्त टेस्टिंग करून रोग आटोक्यात आणण्याकडे भर दिला गेला होता व त्यात यश आले होते. त्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावर याही वेळेस टेस्टिंगवर भर देण्यात आला. तसेही येथे बरेच लोक सरसकट मास्क घालतात. सोशल डिस्टन्सिंग व वारंवार हात धुणे याविषयी नियम जारी होताच, दक्षिण कोरिया हा शिस्तप्रिय देश असल्याने लोक नियमांचे पालन करत होतेच. तसेच, मोठमोठ्या कार्यालयात प्रवेशद्वारांत थर्मो स्कॅनर्स बसवण्यात आले. कोणा व्यक्तीला ताप असेल तर लगेच कोविद चाचणी करण्यास पाठवले जाई. निरीक्षण, देखरेख व मूल्यांकन यावर भर दिला गेला. मला कोरियन भाषा थोडी थोडी येते परंतु ते नियम मला कळले नव्हते. पण आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी माझ्यासाठी सरकारने वितरित केलेले मास्क आणून दिले. मास्क न लावल्यास दंड आकारण्यात येत होता व परदेशी लोकांना तर तो अडीच हजार डॉलर इतका होता.
          दक्षिण कोरियात लॉकडाऊन जाहीर झाला नाही परंतु शाळा बंद करण्यात आल्या. फेब्रुवारी अखेरपर्यंत चीन वगळता सर्वात जास्त केसेस दक्षिण कोरियात नोंद झाल्या होत्या. तरी परिस्थिती लवकर आटोक्यात आणल्याबद्दल जगभर कोरियाचे कौतुक होत होते. परंतु नियती वेगळाच डाव मांडत होती. जरी बहुतांश जनता नियम पाळत होती तरी काही अपवाद होतेच. मे महिन्याच्या अखेरीस एक संक्रमित माणूस अनेक पब्समधून फिरला. त्याला लागण झाली असल्याचे चाचणीत आले. रोगाचे थैमान परत पसरू लागले. त्यामुळे सगळे नियम पुन्हा लागू केले. जमाव करण्यास मज्जाव करण्यात आला. पब्स, जीम अशी ठिकाणे बंद ठेवण्यात आली.
          जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत व एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत बारा हजारच्यावर केसेस झाल्या आहेत व बहुतांश पेशंट बरे होऊन घरी जात आहेत. दोनशे ऐंशी रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्या काळात साडेबारा लाखांहून जास्त चाचण्या घेतल्या गेल्या. त्या सर्व सरकारी खर्चाने करण्यात आल्या. लोकांना त्या मोफत होत्या.

 

          लॉकडाऊसल्यामुळे अनेक कार्यालये चालू होती; काही जण घरून काम करत होते. कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी इन्फ्रा रेड स्कॅनर्समधून जावे लागते. जर कोणा कर्मचाऱ्याला ताप असेल तर अलार्म वाजतो. मग त्याची तपासणी प्रथम डॉक्टरांतर्फे केली जाते व त्याला चाचणीसाठी पाठवले जाते. कार्यालयात कामानुसार लोकांना क्लस्टर करून बसवले जाते. त्यामुळे त्यांची कमीत कमी हालचाल होते. क्लस्टरमध्येही त्यांना दूर दूर बसवले जाते. तीच गोष्ट कॅण्टीनची. सगळ्यांना जेवणाच्या वेळा नेमून दिल्या त्यामुळे तेथे गर्दी होत नाही. कॅण्टीनमधील पन्नास टक्के खुर्च्या काढून अंतर ठेवले जाते.
          सरकारी इस्पितळात चाचणीसाठी वेगळे तंबू उभारले आहेत. एकदा चाचणी झाली, की तिचा निकाल येईस्तोवर व्यक्तीला ट्रॅक केले जाते. िकाल निगेटिव्ह असेल तर फोनवर मेसेज येतो. पॉझिटीव्ह असेल तर त्वरित इस्पितळात भरती केले जाते.
अमृता अनिल हन्नुरकर amrutahunnurkar@yahoo.com
अमृता हन्नुरकर या नवी मुंबईच्या वाशीला लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेत झाले. त्यांनी शिकागो बूथमधून एमबीएचे शिक्षण घेतले. त्या गेली तीन वर्षे सेऊलला सॅमसंग कंपनीत कार्यरत आहेत.  
———————————————————————————————————

About Post Author

31 COMMENTS

  1. Amruta …You have given an insight into the health care system of south Korea….That country is known for its expertise and advanced health care …Bit your article helped us to understand how they are focussed and swing into action immediately to control the situation and protect the residents…You are fortunate to be in this country at a time when survival is of prime importance for one and all

  2. अमृता खुप छान लिहिलं आहेस दक्षिण कोरियातील कोरओनाच्या सद्य परिस्थिती विषयी..आम्हाला भारतात छान माहिती मिळाली.कोरियन सरकार त्याचे ही साथ रोखण्यासाठी चे उपक्रम आणि त्यांना पूर्णपणे साथ देणारी जनता याच कौतुक आहे आणि तूझ्या शब्दात तू छान रेखाटल आहेस..आपला देश सोडून एका दुसऱ्या देशात वास्तव्य असता ना त्याच्या साठी अप्रिसिएशन च हे लिखाण म्हजे तुझ खुप कौतुक आहे…👌👍

  3. दक्षिण कोरिया ची महत्वपूर्ण माहिती मिळाली . वेगवेगळे देश आणि तिथे प्रत्यक्षात अनुभवलेला कोविद काळ ,जगभरातील सुरु असलेल्या या महामारीची भीषण परिस्थिती समोर आणते ..खूप छान लेखन आहे .. अभिनंदन.

  4. Amruta you have expressed it so well. Today Covid has brought so much uncertainty in people. This can also be a case study, as to how this situation was tackled by Korean authorities and also the responsible citizens. Wonderful..good job. This article should be shared with many.

  5. माला काही डाउट नाही।अमृता तिचा आई सारखी ब्रिलिएंट आहेमोहन लिमये

  6. अम्रृता,कमीतकमी शब्दात लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख!एखाद्या कसलेल्या लेखकासारखा.द. कोरिया आशियातील खूप पुढारलेला देश का आहे ते ह्या लेखातून समजतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here