फोकण पद्धत म्हणजे वाल हाताने शेतात फेकणे व टोकत पद्धत किंवा चेपणीचा वाल म्हणजे काठीने वाल जमिनीत चेपणे. या प्रकारात जमिनीत काठीने भोके पाडून त्यात एका वेळेस दोन वाल चेपून म्हणजेच दाबून लावले जातात.
वाल फुलायचा तसेच कोवळ्या व तयार शेंगा येण्याचा हंगाम (मौसम) हा संक्रांतीच्या जवळपास असतो. संक्रांतीच्या पूजेत वालाच्या व बांधावरच्या घेवड्याच्या शेंगा ठेवतात. त्या दोन्ही शेंगांची (दाण्याची) उसळ संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी करतात.
वालाच्या स्वतंत्र पीकात कोथिंबीर , मुळा , मोहरी वगैरे पेरतात. वालाच्या पीकातील कोथिंबीरीला येणारा छान वास हा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे ती कोथिंबीर विशेष प्रसिद्ध आहे.
कडवे वाल टिकवण्यासाठी त्यांना नऊ ऊन्हे देण्याची गरज असते. नंतर त्यांना तांबड माती लावून ठेवतात, त्यासाठी वाल रांजणात किंवा डब्यात भरून ठेवणे उपयुक्त ठरते. काहीजण त्यावर बिब्बा ठेवून, मग कागदाने बंद करुन झाकण लावतात. कीड लागू नये म्हणून हे नियोजन केले जाते. वाल निवडून ठेवला जातो. निवडताना त्यातील चहाड, मुकण्या बाहेर काढल्या जातात. चहाड म्हणजे कठीण व लगेच न शिजणारा वाल. मुकण्या म्हणजे बारीक वाल. त्याची डाळ करतात. वालाची डाळ घरटीवर केली जाते. घरटी म्हणजे मोठे जाते . जाते फिरवताना बायका (स्त्रिया) ओव्या म्हणतात.
वालाचे निरनिराळे पदार्थ, भाज्या केल्या जातात. बिरडे किंवा डाळिंब्या. वालाचे दाणे भिजत टाकून, सुके किंवा ओले, दोन्ही प्रकारच्या डाळिंब्या किंवा उसळ केली जाते. त्यावरची साल काढून टाकली जाते. वालाचे नाक (मोड) बाहेर आले, की मग त्याच्या डाळिंब्या करतात. वाल भाजून त्यांना उकडतात व त्यावरचे पाणी काढून, त्यांत थोडे ताक मिसळून जिर्याची फोडणी देऊन त्यात तिखट, मीठ टाकतात. त्याला वालाचे कढण म्हणतात.
तापवलेले वाल घरटीवर भरडतात व मग ती डाळ निवडून चाळतात. तेव्हा बारीक भरडा निघतो. त्याचीही उसळ किंवा वरण केले जाते. भरड्याला काही जण कळणा म्हणतात. कळण्याच्या वड्याही केल्या जातात. त्यासाठी तांदूळ व भरडा, तसेच मुगाची किंवा चण्याची डाळ घेतात. हे सर्व भाजून मग त्यात तिखट, मीठ, आले वगैरे मिसळून त्याच्या वड्या बनवतात. वालाची डाळ किंवा वाल भारंगीच्या भाजीत, कुड्याच्या शेंगात, फणसाच्या भाजीत टाकून भाजी करतात.
खोपोलीपासून पुढे घाटावर व इतरत्र जो वाल होतो तो थोडा गोड असतो. उग्र किंवा तुरट नसतो. म्हणून नागोठणा–मेंढ्याकडच्या वालास कडवा वाल म्हणतात. ह्या वालाची चव वैशिष्ट्यपूर्ण असते. म्हणूनच रोहा तालुक्यातील वालाचा खप (विक्री) जास्त आहे. त्या वालांची किंमत (दर) काही वेळा जास्त असते. सध्या गावाकडे तो दीडशे रुपये किलो अशा दराने मिळतो. मुंबईत तो किलोला चारशे रुपयेपर्यंत असतो.
शेतातून वालपीक काढल्यावर त्याचे बी (वाल) शेतात पडते. त्यापासूनही पावसाळ्याच्या सुरूवातीस मोरव येऊन वालाची रोपे दिसतात, त्यालाही बिरडे असे म्हणतात. त्याचाही भाजीसाठी उपयोग होतो.
(कडव्या वालाचे छायाचित्र. सौजन्य – दिनेश शिंदे)
महाजालावरील इतर दुवे –
कडव्या वालाच्या पाककृती
नारायण पराडकर,
मु. पो. मेढे, ता. रोहा,
जिल्हा रायगड,
भ्रमणध्वनी – ९२७२६७७९१६
दूरध्वनी –०२१९ –४२५८०८६
इमेल –nrparadkar9@gmai.com
Chan mahiti..lahanpanche
Chan mahiti..lahanpanche divas pathvale..popatimadhye..rsyali.vange..batata..pandhre kande shevgyachya shenga pan takatat.
मि रोहा येथे नोकरीला
मी रोहा येथे नोकरीला असताना पोपटीची मजा घेतली आहे. फारच छान!
Mast lekh .aavdala
Mast lekh .aavdala
माहिती सुंदरच आहे. आपणाकडे…
माहिती सुंदरच आहे. आपणाकडे वाल विक्रीस आसतात का?आसेल तर कृपया सांगणे Mob.no 9822065973 Pune
Comments are closed.