ओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ

11
119
carasole

प्लेगचे कारण घेऊन पुण्याच्या कमिशनरांनी काही पाचपोच न ठेवता लोकांच्या घरात शिरून लोकांचा छळ आरंभला होता तेव्हा “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” हा अग्रलेख ‘केसरी’त लिहिणारे लोकमान्य.

माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा निराशाजनक असल्यामुळे, ‘उजाडलं, पण सूर्य कुठे आहे’ हा ‘केसरी’त अग्रलेख लिहिणारे लोकमान्य.

मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’सारखा ग्रंथ लिहिणारे लोकमान्य…

पण लोकमान्य टिळक हे गृहस्थ मुळात मोठे अभ्यासू होते. गणित आणि खगोल-विज्ञान हे त्यांचे प्रिय विषय. अभ्यासात मग्न होऊन संशोधन करावे आणि शास्त्रज्ञ बनावे अशी त्यांची इच्छा होती. ते संस्कृत भाषेतसुद्धा पारंगत होते. त्यांचे भक्त बंगाल प्रांतात तर होतेच; पण लखनौ, लाहोर येथेही होते. बॅ. जिना यांच्याशी त्यांचे सख्य होते. त्यांनी जोतिबा फुले यांच्याशी (चिपळूणकरांप्रमाणे) वितंडवाद घातला नाही. ते जगले असते तर त्यांनी आंबेडकरांशीही जमवून घेतले असते.

त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी ग्रंथांपैकी The Orion आणि The Arctic Home in the Vedas हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी दुसरा ग्रंथ बराच परिचित आहे व त्याच्या शीर्षकावरून, तो न वाचताही त्याचा आशय काय असावा याची कल्पना येते. पण Orion ची कल्पना येत नाही. मात्र, ‘गुगल’मध्ये शोधल्यास The Orion या ग्रंथाच्या मूळ प्रतीची फोटोकॉपी मिळते!

मृगशीर्ष नक्षत्रOrion हे अठ्ठावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र. नक्षत्रे म्हणजे तारे-समूह. भारतीय नक्षत्रांची काही नावे महिन्यांच्या नावांसारखी आहेत. उदाहरणार्थ, अश्विनी नक्षत्र आणि अश्विन महिना. पण महिने बारा तर नक्षत्रे अठ्ठावीस आहेत. Orion या नक्षत्राचे भारतीय नाव मृगशीर्ष आहे, मार्गशीर्ष या महिन्याच्या नावासारखे. लोकमान्यांच्या भगवद्गीता वाचत असताना लक्षात आले, की ‘छदांमध्ये गायत्री मी, महिन्यांमध्ये मार्गशीर्षमी आणि ऋतूंमध्ये वसंत मी’ असे श्रीकृष्ण म्हणतात (अध्याय १० श्लोक ३५)

परंतु भारतीय वर्षाची सुरुवात वसंत ऋतूने होते आणि महिना चैत्र असतो. मग श्रीकृष्ण महिन्यांमध्ये चैत्र मी असे न म्हणता मार्गशीर्ष का म्हणाले? लोकमान्यांना त्या प्रश्नाचा घोर लागला. त्यातूनच सुरू झालेल्या त्यांच्या दोन वर्षांच्या खटाटोपानंतर Orion हा ग्रंथ निर्माण झाला. त्याचे ‘टाईम्स’कारांनीदेखील कौतुक केले. लोकमान्यांची गणना राजकारणात जहाल म्हणून १८९३ मध्ये होऊ लागलेली नव्हती.

पृथ्वी चोवीस तासांमध्ये स्वतःच्या आसाभोवती गोल फिरते, पण आस स्थिर नसतो. त्याचे दक्षिण टोक आणि उत्तर टोक वर्तुळाकार फिरतात आणि आइस्क्रिमचा कोन असतो त्याप्रमाणे पृथ्वीचा उत्तर ध्रुव वर्तुळाकार फिरत फिरत एक कोन तयार होतो. दक्षिण ध्रुव पण तेच करतो.  (भोवरा फिरताना त्याची गती जरा कमी झाली तर तो वॉबल करू लागतो हे  जे लोक भोवरा खेळले आहेत त्यांच्या ध्यानी आले असेलच.)  पृथ्वीला जरी स्वतःभोवती फिरण्यास चोवीस तास लागत असले आणि सूर्याभोवती फिरायला ३६५ दिवस लागत असले तरी पृथ्वीच्या आसाचे उत्तर ध्रुव (आणि दक्षिण ध्रुव) ३६० अंश गोल फिरायला सव्वीस हजार वर्षे लागतात. त्या फिरण्याला precession असे नाव आहे. Precession चा पत्ता Hipparchus ला इसवी सनापूर्वी दीडशे वर्षे लागला होता. अर्थातच हिंदू शास्त्रज्ञांना ते त्या आधीच समजले होते असे लोकमान्य म्हणतात यात नवल नाही. पृथ्वीच्या आसाचे उत्तर टोक जर ध्रुव तारा दाखवत असेल तर ३६० अंश गोल फिरल्यानंतर पुन्हा ध्रुव तारा दाखवायला आणखी सव्वीस हजार वर्षे लागतील. कारण त्याला पूर्ण वर्तुळाकार फिरण्याला  तेवढी वर्षे लागतात.

पृथ्‍वीचे बाजूने पाहिले असता दिसणारे चित्रपृथ्‍वीचे वरून पाहिले असता दिसणारे चित्रपृथ्वीच्या अशा अस्थिर वागणुकीमुळे (wobbling nature) दिवस-रात्र सारखे असण्याच्या  वेळा (२० मार्च आणि २२ सप्टेंबर या दिवशी ) आणि उत्तर गोलार्धात  दिवस अगदी लहान (२३ डिसेंबर) आणि दिवस अगदी मोठा (२३ जून) असण्याच्या वेळा दर वर्षी वीस मिनिटांनी मागे जातात.  ही तारीख एक महिन्याने मागे जाण्यास

20 minutes : (30 X 24 X 60) minutes : 1 year : ?
=   २१६० वर्षे लागतील.

पण महिने बारा तर नक्षत्रे अठ्ठावीस. त्यामुळे सूर्य एक नक्षत्र मागे जाण्याला २१६०/२ = सुमारे  एक हजार वर्षे लागत असली पाहिजेत. नववर्षाचा आरंभ चैत्र महिन्यात व वसंत ऋतूत अश्विनी नक्षत्रात होतो. वेदकाळात नववर्षाचा आरंभ चैत्र महिन्यात वसंत ऋतूत मृगशीर्ष नक्षत्रात होत असे. श्रीकृष्णाच्या ‘छदांमध्ये गायत्री मी, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष मी आणि ऋतूंमध्ये वसंत मी’ या म्हणण्याचा असा अर्थ लागतो.

म्हणजे सूर्य आधुनिक काळात सहा नक्षत्रे पुढे आहे किंवा सूर्य नारायण कालौघात सहा नक्षत्रे ओलांडून पुढे गेले. यावरून वेद सहा हजार वर्षांपूर्वी (म्हणजे इसवी सनापूर्वी चार हजार वर्षे) तयार झाले असावेत असा अंदाज लोकमान्यांनी बांधला.

थोडक्यात म्हणजे वेद केव्हा तयार झाले हे लोकमान्यांच्या Orion या ग्रंथात आणि वेद कुठे बनले हे त्यांच्या The Arctic Home in the Vedas या ग्रंथात वाचायला सापडते. लोकमान्यांचा Orion हा ग्रंथ दोनशेचाळीस पानांचा आहे. त्यातील मुख्य खटाटोप ऋग्वेद वाचून त्यातून त्याच्या निर्मिती कालाबाबत असा निष्कर्ष निघतो हे सिध्द करण्याचा आहे. ऋग्वेदातील संस्कृत वाचणे हे फारच कठीण काम आहे. ते लोकमान्यांनी परिश्रमपूर्वक केले. त्यांच्या ग्रंथाची बरीचशी पाने पाश्चात्य ग्रंथकार चुकले हे दर्शवण्यात खर्ची पडली आहेत. त्यांच्या मूळ ग्रंथातील चार पाने पुढे जोडली आहेत.
THE ORION
OR RESEARCHES INTO
THE ANTIQUITY OF THE VEDAS
BY
BAL GANGADHAR TILAK, B.A., LL.B.,
LAW LECTURER, AND PLEADER, POONA

All rights reserved.
BOMBAY:
MRS RADHABAI ATMARAM SAGUN
BOOKSELLERS AND PUBLISHERS
1893

Summary of this essay was published in the Ninth Oriental Congress held in London last year
(1892.) The essay has been further revised and I am publishing it now
in a book form (1893.)

My special thanks are due to Dr. Ramkrishna Gopal Bhandarkar, who kindly undertook to explain to me the views of German scholars in regard to certain passages from the Rigveda.

And to Khan Bahadur Dr. Dastur Hoshang Jamasp for the ready assistance he gave in supplying information contained in the original Parsi sacred books.

I am also greatly indebted to Prof. Max Muller for some valuable suggestions and critical comments on the etymological evidence contained in the essay.

वसंत केळकर
९९६९५३३१४६
vasantkelkar@hotmail.com

About Post Author

11 COMMENTS

 1. श्री केळकरानी थोडक्यात आणि
  श्री केळकरानी थोडक्यात आणि तरीही अतिशय सुबोध रीतीने ओरायनचे नेमके महत्त्व विशद केले आहे, या बद्दल ते अभिनंदनास पत्र आहेत.

 2. Nakshtre 28 ki 27 ?

  Nakshtre 28 ki 27? Ved apureshya ahet ase vedant sangto. Mhanun ved kadhi ” banale”” he vakya apratut vatate.
  Baki lekh Chan.

 3. 1.थाेडक्यात पण मुळ
  थाेडक्यात पण मुळ ग्रंथाबद्दल उत्कंठा वाढवणारा परिचय. लाेकमान्य टिळक ज्या तळमळीने स्वतंत्र्यासाठी लढले तेवढेच श्रम किंवा त्यापेक्षाही अधिक श्रम ते संशोधन कार्यावर खर्च करत. आजच्या तथा कथित प्राध्यापक डॉक्टरांना लाजवणा-या या कार्याचा परिचय दिल्याबद्दल लेखक व ‘थिंक महाराष्ट्र’चे अभिनंदन!

 4. what did mr.tilak think…
  what did mr.tilak think about untouchability is more important question.

 5. श्री केळकर यांनी अगदी सोप्या…
  श्री केळकर यांनी अगदी सोप्या भाषेत लोकमान्य टिळकांच्या ओरायन ग्रंथाची माहिती दिली आहे. त्यामुळे लोकमान्य टिळकांबद्दल आदर द्विगुणीत झाला. श्री केळकर यांच्याविषयीही आदर वाढला. ओरायन विषयी कुतुहल वाढले. पण खगोलशास्त्राविषयी फारशी माहिती नसल्यामुळे व विशेषतः नक्षत्रांची इंग्रजी नावे माहित नसल्यामुळे मूळ पुस्तक समजणे शक्य होईल वा नाही याची खात्री वाटत नाही. ओरायनची मराठीत अनुवादित प्रत आहे काय व असल्यास तिची माहिती मिळावी असे वाटते. किमान केळकरांच्या याविषयीची माहिती मिळावी अशी विनंति आहे. धन्यवाद.

 6. As far as my knowledge of…
  As far as my knowledge of the
  Solar System is concerned, it is located in the Dwarf Arm of Our Galaxy, i.e. The Milky Way”, This arm is also known as Oroan !f Is it the same ,then why, among the
  Prominent Stars,, The Sun has not been mentioned ?

 7. धन्यवाद. एका…
  धन्यवाद. एका महत्त्त्त्वाच्या आणि विषेश ग्रथाची ओळख झाली. लो. टिळक केवळ लोक नेते नव्हते तर एक scientist होते ही माहिती मिळाली.

 8. फारच छान , हे खूप छान लिहीले…
  फारच छान , हे खूप छान लिहीले आहे

 9. ओरायन -ग्रंथ वाचलेला नाही …
  ओरायन -ग्रंथ वाचलेला नाही ,पण या माहितीमुळे वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे — गीतारहस्य , वाचतांना अनेक तत्वज्ञानांचे संदर्भ पुन्हां पुन्हा वाचून समजावून घ्यावे लागले .

 10. उत्कंठावर्धक लेख.
  उत्कंठावर्धक लेख.

 11. मुळ ग्रंथाबाबत उत्कंठा वाढली…
  मुळ ग्रंथाबाबत उत्कंठा वाढली आहे..

Comments are closed.