एशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र

0
32

एशियाटीक सोसायटीमुंबईच्या सांस्कृतिक उच्चाभिरुची एक ओळख म्हणजे ‘एशियाटीक सोसायटी’. २६ नोव्हेंबर १८०४ म्हणजे दोनशे पाच वर्षापूर्वी त्या वेळचे मुंबई उच्च न्यायालयाचे रेकॉर्डर ( म्हणजे सर्वोच्य न्यायमूर्ती) सर जेम्स मॅकिटोश (Sir Jems Mackintosh) यांनी मुंबई परिसराचा व शहराचा सखोल अभ्यास करण्याकरिता समविचारी मंडळींना एकत्र आणले. पुरातन वस्तूशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र यांच्या सखोल अभ्यास चितनातून मुंबईच्या आणि त्याच्या अनुषंगाने भारताच्या प्राचीन गौरवशाली संस्कृतीचा शोध हा या सा-या ज्ञानपिपास लोकांच्या अभ्यासाचा गाभा होता. मिळतील त्या कागद पत्रांची अचूकतेने छाननी, विश्वासार्ह इतिहासाच्या नोंदी आणि त्या करतां निर्दोष कार्यपद्धतीची प्रणाली निर्माण करुन ‘एशियाटिक’चा सहढ पाया घालण्याचे काम या ब्रिटीश विद्वानांनी केले.

एशियाटिकमध्ये एक लाखहून अधिक एवढी प्रचंड ग्रंथसंपदा आहे. पंधरा हजारांहून अधिक दुर्मीळ ग्रंथ, पोथ्या-हस्त लिखिते या खजिन्यात आहेत. तर तीन हजार संस्कृत, प्राकृत, पर्शियन प्राचीन हस्तलिखिते ही जतन केलेली आहेत.

चिकित्सक विद्वानांच्या जिद्धीमुळे व निरपेक्ष, निरलस सेवाभावामुळे हा ठेवा जीवंत राहू शकला आहे. मुंबईच्या या एशियाटिकमधील काही ग्रंथांची जरी नुसती ओझरती ओळख करुन घेतली तरी त्याचे मूल्य पैशांत न होण्याएवढे किती प्रचंड मोठे आहे हे उमजले.

बाराव्या शतकांतील जैन तीर्थंकरांच्या जीवनावरील संहिता, सोळाव्या शतकातील संस्कृत भाषेत लिहिलेली महाभारतातील अरण्यक पवनाची प्रत किंवा १०५३ मधील पर्शियन भाषेतील फिरदौसी यांचा शहानामा या दुर्मिळ ग्रंथांनी एशियाटिकची श्रीमंती वाढली आहे. जगप्रसिद्ध इटालीयन कवी दांते (DANTE) यांची ‘डिव्हाइन कॉमेडी’ ही एक अभूतपूर्व (CLASSIC) निर्मिती म्हणून जगभरच्या रसिक विद्वानांत मान्यता पावली आहे. पंधराव्या शतकातील या ‘डिव्हाईन कॉमेडी’ची प्रत एशियाटिकच्या खजिन्यात रूजू झाली ती खुद मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर माऊंस्टुअर्ट एलफिन्स्टन यांच्या औदार्यपूर्ण या ग्रंथरुपी देणगीमुळे!

एरवी राजकारणी योध्दा असलेल्या इटलीच्या हुकुमशहा मुसोलिनीला दांते यांच्या या ग्रंथांची मेहती व साहित्यिक उंचीची जाण होती. इटलीच्या सांस्कृतिक वैभवाचे हे प्रतीक आहे असे त्यास मनोमन पटले होते. व म्हणून तो ठेवा मूळ देशात इटलीत परत यावा म्हणून तो उत्सुक होता.

१९३० साली ( ज्या वेळी जागतिक मंदीमुळे सारे जग कोसळते होते) मुसोलिनीने एशियाटिक सोसायटीला एक लाख पौंड ( सध्याच्या किंमतीत ऐंशी लाख रुपये) देऊ केले दांतेची मूळ ‘डिव्हाईन कॉमेडी’ची प्रत विकत देण्याची विनंती केली.एशियाटीक सोसायटीचे जुन्‍या काळचे चित्र. (विकीपिडीयावरून साभार)

त्‍या लहानशा संस्थेला एवढी प्रचंड रक्कम देऊ केल्यावर दांतेची मूळ प्रत मिळवण्यास काहीच अडचणी येणार नाही व अगदी सहजपणे आपण ती इटलीला परत घेऊन जाऊ शकू अस गृहीत धरलेल्या मुस्तोतिनीच्या या ठाम समजूतीली एशियाटिक सोसायटीने दिलेल्या स्पष्ट नकारामुळे धक्काच बसला.

संस्कृतीवरील श्रद्धा तिच्या जतनाची कळकळ आणि परंपरेचा सन्मान या सूंत्रीत काम करणा-या एशियाटिकला पैशांचा ऐहिक मोह त्या खडकर काळातही पडला नाही. सोसायटी ख-या अर्थाने अधिक श्रीमंत झाली. ज्यांनी या वैभवी संस्कृतीच्या पायाचे रोपटे लावले तो सातवृक्ष आता बहरलेला, डवरलेला दोनशे वर्षांचा झाला आहे.

२६ नोव्हेंबरच्या स्थापना दिनी त्याच्या जनादात्यांचे पुण्यस्मरण करुन व त्या दिवशी नवीन संकल्पनांची रुजवण करत त्या सर्वांप्रती कुतज्ञता व्यक्त करणे हा एशियाटिकच्या पंरपरेचा भाग आहे.

दुर्देवाने मागील वर्षी याच दिवशी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई दहशतवादी बेभान हिंस्त्र हल्ल्याचे लक्ष्य झाली. अपरिमित जीवित हानी, ऎतिहासिक वास्तूंचे उध्वस्त्रीकरण तर झालेच पण त्या बरोबरच या शहराचे आगळे वेगळेपणही पुसून टाकण्याचा ते बिघडून दूषित करण्याचा प्रयास झाला.

पण बहुरंगी बहुढंगी बहुभाषिक बहुधर्मी कामगारांची मुंबई श्रीमंतांची मुंबई सा-यांपेक्षा वेगळीचा मुंबई याही धक्क्यातून सावरली, उभी राहिली.

२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरलेल्यांच्या पहिल्या स्‍मृतीदिनी आणि एशियाटिकच्या स्थापना दिनीच्या पार्श्वभूमीवर एशियाटिकचे अध्यक्ष डाँ. अरुण टिकेकरांनी एका नवीन संकल्पनेची मांडणी आणि तीतडीस नेण्याची निर्धार-इच्छा एका छोटेखानी समारंभात या दिवशी जाहीर केली.

ब्रिटिशांनाच नाही तर जगभरच्या परदेशी वदेशी लोकांनाही ज्या मुंबईने मोहिनी घातली आहे. आपल्या शहरावरील प्रेम प्रत्येक मुंबईकरावर बिंबवणे, मुंबईचा वैभवशाली इतिहास सर्वास सर्वांगाने परिचित करुन देणे, तो सा-या अल्पस्त्रत्व नोंदीसह जतन करणे अगत्याचेच नाही तर अग्रक्रमाचे होते. त्याकरीता मुंबई रिसर्च सेंटरची स्थापना करुन टिकेकरांनी एक प्रासतिक कामाची सुरवात केली आहे.

याकरिता खुद मुंबईमध्येच मुंबई रिसर्च सेंटरच्या माध्यमातून मुंबईवर काम करणा-या वेगवेगळ्या अभ्यासकांचा आपापसात संवाद घडवून आणणे, मुंबई बाहेरील उर्वरितांना या प्रवाहात आणून त्यांच्या मुंबई व पश्चिम महाराष्ट्रावरील अभ्यासाला सर्व प्रकारे साहाय्य करणे आणि त्या करता स्थानिक भाषेत असलेल्या पुस्तके-कागदपत्रांचा शोध घेणे ही प्रमुख उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवली आहेत.

याचाच भाग म्हणजे अशा प्रकारच्या जुन्या सर्व साहित्यकृतींचा समावेश एशियाटीकच्या दालनात करुन घेणे. पु. ल. देशपांडेंनी त्यांच्या नाटकांची, भाषणांची लेखांची हस्तलिखिते केव्हाच एशियाटिकला सुपुर्द केली आहेत. पुढील शतकात मराठी साहित्याचा अभ्यास करणा-यांना पु. ल. या व्यक्तिमत्त्वाची ही अनोखी लिखित ओळखच आहे!

२६ नोव्हेंबर २००९ च्या या कार्यक्रमाचे अजून वैशिष्टय म्हणजे लंडननिवासी मुकुंद नवाथे व इतिहासकार कै. य. दि. फडके यांच्या पत्नी श्रीमती वांसती फडके यांचा मुबईच्या रिसर्च सेंटरला लागलेला सक्रिय हातभार.

मुकुंद नवाथे गेले अर्धशतक लंडनमध्ये स्थायिक आहेत. लंडन-पुण्या-मुंबईच्या जुन्या बाजारातून जुनी विशेषत: महाराष्ट्रावरील दुर्मीळ चित्रकार्डे जमविण्याच्या त्यांचा छंद त्यांनी निष्ठेने, खिशाला भरपूर खार लावून जोपासला आहे. ब्रिटिश काळापासून सर्व विषयाला स्पर्श करणारी टपालकार्ड चित्रे त्यांच्या संग्रहात आहेत. इ.स. १८०० पासूनची जुनी मुंबई त्यातील घोडागाड्या, ट्राम, महाविद्यालये, रेल्वे, स्थानक इमारती, चाळी, त्यातील गणेशोत्सव फुगड्या, भोंडला एकमेकींच्या वेण्या घालणा-या स्त्रिया एक ना अनेक चित्रांचे गाठोडे मुकुंद नवाथे रोली कित्येक वर्ष प्राणपणात जपत आहेत. ती चित्रे जुना काळ डोळ्यांसमोर उभा करतात. एकेक चित्र म्हणजे इतिहासाचे पुसले गेलेले एकेक सोनेरी पान आहे ! एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीची अशी हजारांहून अधिक अमूल्य सोन्यांच्या पानांची गुहा मुकुंद नवाथे यांनी पुढच्या पिढीला एशियाटिकच्या माध्यमातून सस्नेह भेटी दाखल दिली आहेत. जुन्या मुंबच्या वास्तव दर्शनाचे एशियाटिकमधील वास्तव्य सर्वांसच सुखाविणारे आहे.

कै. य.दि.फडकेंचा इतिहासकार म्हणून मोठा दबदबा होता. मुंबई-महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय विषयांशी अनेक व्यक्ति, संस्था य़ांच्यावर प्रबंधात्मक अभ्यासपूर्ण काढलेल्या तीन हजार कार्डांची ( कागदपत्रांची) अतिशय परिश्रमपूर्वक तयाक केलीली सारी (संहिता ) श्रीमती वासंतीबाई फडके यांनी याच कार्यक्रमाद्वारे डॉ. अरुण टिकेकरांच्या हवाली केली.

मुंबईचे मोठेपण या दनाशूरांच्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपलेल्या आणि नंतर योग्य स्थळी भेट वस्तू म्हणून दिलेल्या त्यांच्या संग्रहातून नव्या पिढीपुढे व सध्याच्या मुंबईवर नितांत प्रेम करणा-यापुढे नेहमीच आदर्शवत राहील.

कुमार नवाथे,
साईप्रसाद , ६ वा मजला, दयाळदास रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०००५७.
फोन – २६११८३०९, मोबाईल – ९८६९०१४४८६

About Post Author