अभिप्राय

0
23

thinkmaharashtra.com वर अलिकडे सादर झालेल्या
लेखनावर आलेल्या या प्रतिक्रिया. एकत्रित स्वरूपात,
त्या त्या लेखनाखाली त्या आहेतच. प्रत्येक
प्रतिक्रियेला मूळ लेखनाची लिंक दिली आहे.

थिंक महाराष्ट्र’: भविष्यकाळातल्या पत्रकारितेचीनवी तुतारी

To get responses and pro-con- discussion, such an article will need to be deliberately imperfect, somewhat inaccurate, and provocative. Good news hardly become news or at least does not attract attention like a not so good does…

– Laxman G. Phadke

थिंक महाराष्ट्र’: भविष्यकाळातल्या पत्रकारितेचीनवी तुतारी

मी ह्याच्याशी सहमत नाही,ग्रामीण भागातले किती लोक आज इंटरनेट वापारतात?/हा उपक्रम चांगला आहे,पण जिथे दहा तास वीज नसते तिथे कोण इंटरनेट लावणार आहे?तुतारी ऐकणार कोण?

– संध्या जोशी

मोहेंजोदडो ते मोरगाव...

नेमाडे ग्रेट आहेतच असे समजून ज्ञानदांनी हिंदू वाचली आहे का? मला तर ती नॉस्टॉल्जिक वाटली…

पुरूषांना आवडेल अशी.

-अमृता शहाणे

हिंदू सुनील तांबेप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा पूर्ण वाचली. खूप आवडली.

– चंद्रकात पाटील

‘आयपॅड’वर मराठी पुस्तके!

i am feeling very good, for mandar joglekar – is climbing the steps. wish him and all the team “VERY BEST WISHES” to become world big-company.

shreeram apte

About Post Author

Previous articleमहालक्ष्मी, कोल्हापूरची
Next article‘प्रॅगमॅटिक्स’ – अध्याहृताचे भाषिक तत्त्वज्ञान
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.