अकलुजमधील कुस्ती स्पर्धा

0
77
carasole

सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील अकलुजमध्ये त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. ती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर नानासाहेब पाटील व धर्मवीर सदाशिव माने-पाटील या तीन बंधूंच्या स्मरणार्थ आहे.

कुस्ती स्पर्धा दरवर्षी 14 जानेवारी (मकर संक्रातीला) पासून सलग तीन दिवस असते. स्पर्धेत साडेसातशे-आठशे स्पर्धक असतात. स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, जळगाव, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातून पैलवान येतात. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांतूनही स्पर्धक स्पर्धेत भाग घेतात. स्पर्धा पंचवीस किलोपासून पुढे खुल्या गटात खेळवल्या जातात. कुस्ती स्पर्धेसाठी आठ ते दहा लाखांपर्यंत बक्षिसे दिली जातात. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास त्रिमूर्ती चषक दिला जातो. स्पर्धेत खेळलेले पैलवान पुढे ‘महाराष्ट्र केसरी’चे पैलवान म्हणून तयार झाले. मगराचे निमगाव येथील छोटा रावसाहेब मगर, तानाजी बनकर, मुंबई महापौर केसरी तानाजी माने इत्यादी पैलवान राज्य पातळीवर महाराष्ट्र केसरी झाले. त्याचप्रमाणे हिरामण बनकर हा ‘महाराष्ट्र केसरी’ शिवतीर्थ आखाड्यातून तयार झाला.

महाशिवरात्रीला खुल्या कुस्ती, मैदानी कुस्त्या लावल्या जातात.

जयसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामीण भागातील कुस्ती या खेळाची जोपासना केली. तशीच जोपासना करण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. मदनसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांची स्वत:ची तालीम तयार करून मुलांना प्रशिक्षण दिले. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी गावोगावी तालमी बांधून दिल्या आहेत. व्यायाम साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

(माहिती स्रोत – वसंत पांडुरंग जाधव, 9960002462)

– गणेश पोळ

About Post Author

Previous articleवाडवळ समाज व संस्कृती
Next articleमेडशिंगी गावाची संस्कारातून समृद्धी
गणेश पोळ यांनी 'विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय' येथून इतिहास या विषयात बी.ए.ची पदवी मिळवली. त्‍यानंतर ते शेतीकडे वळले. मात्र पत्रकारितेची आवड असल्‍याने त्‍यांनी 'सोलापूर विदयापीठा'तून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. त्‍यांनी सोलापूरातील 'दैनिक दिव्य जनसेवा' या दैनिकामध्ये उपसंपादक पदावर काम केले. राजकीय घटनांचे वार्तांकन करणे त्‍यांना आवडते. 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. ते सध्‍या 'दैनिक दिव्‍य मराठी' वर्तमानपत्रात पत्रकारिता करतात. लेखकाचा दूरध्वनी 8888234781