Home Search
हिंदू - search results
If you're not happy with the results, please do another search
मी हिंदू आहे म्हणजे मी कोण आहे?
हिंदू धर्म हा हत्ती आणि सहा आंधळे यांच्या गोष्टीतील हत्तीसारखा आहे. अंध मनुष्य हत्तीच्या ज्या भागाला हात लावतो तो म्हणजेच हत्ती आहे असे त्या प्रत्येकाला वाटत असते. परंतु लेखकाला हत्तीचे संपूर्ण स्वरूप जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे तो म्हणतो, “मी हिंदू आहे म्हणजे कोण आहे, हे मला अद्याप सापडलेले नाही..."
हिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक उपचारातील साम्य
भारतातून हज यात्रेला हजारो भाविक दरवर्षी जातात. त्यांना सरकारने देऊ केलेल्या सवलतींच्या बातम्या व त्यावर प्रतिकूल किंवा अनुकूल प्रतिक्रिया वृत्तपत्रांतून छापून येतात. मात्र त्या वार्तांतून हिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक आचारात असलेले साम्य कधी समोर येत नाही. ते रामचंद्र वझे यांना सुलतान जहाँ बेगमच्या हज यात्रेच्या वृत्तांतात वाचण्यास मिळाले...
जुळे हनुमान, हिंदू-मुस्लिमांना प्रिय !
जुळे हनुमान मंदिर अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यात येते. मंदिरातील जुळ्या हनुमान मूर्ती हिंदू व मुस्लिम, दोन्ही संस्कृतींत श्रद्धेने पूजल्या जातात ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागातील मुस्लिम बंधू ‘हनुमान’ ही त्यांच्या जातीतील देवता आहे असे म्हणतात. त्यामुळे जुळे हनुमान मंदिर मुस्लिम बांधवांनाही हिंदूंएवढेच वंदनीय आहे...
पूर्व आशियातील हिंदू राज्ये व हिंदू संस्कृती (How Hindu empires got spread in Far...
भारतीय लोक विविध कारणांनी फार मोठ्या संख्येने पूर्व आशियात स्थलांतरित होत होते. त्या भागांत गेलेले असे अनेक लोक तेथील स्त्रियांशी लग्ने करून, वसाहत तेथे निर्माण करून राहत. भारतीयांजवळ प्रभावशाली सांस्कृतिक ऐवज होता. त्यामुळे भारतीयांचा बौद्धिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय वरचष्मा सहजगत्या निर्माण होई. कालांतराने पूर्व आशियात हिंदू राज्ये आणि संस्कृती उदयाला त्या वसाहतींमधून आली…
हिंदू राष्ट्र असेल तरी कसे ?
‘हिंदू राष्ट्राची’ चर्चा 2014 पासून म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून अधिकच जोमाने झाली. अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल, ट्रिपल तलाक सारखे कायदे रद्द होणे आणि नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती यामुळे तर अधिकच व्यापकपणे ही चर्चा होऊ लागली. पण ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे काय?
गुढीपाडवा – हिंदू नववर्षाचा आरंभ (Gudhi Padwa)
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
वसई चर्चमधील घंटा हिंदू मंदिरांत! (Bells From Vasai church in Hindu Temples)
चिमाजी अप्पांनी वसई परिसरातील किल्ले पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यानंतर तेथील वेगवेगळ्या चर्चमधून ज्या घंटा मिळाल्या त्या महाराष्ट्रातील विविध मंदिरांत नेऊन बसवण्यात आल्या आहेत. फादर कोरिया...
गुढीपाडवा – हिंदू नववर्षाचा आरंभ
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या...
मायाजालात ‘इंटरनेट हिंदू’
इंटरनेटवरच्या घडामोडी कित्येकशे पटींनी वाढल्या आहेत. इंटरनेटच्या जगातल्या एका वादामुळे गेल्या आठवड्यात अनेक चर्चा झाल्या. त्या वादाच्या परीक्षणातून आपल्या भवतालाकडे बघण्याची, तो तपासण्याची...
घंटीबाबांची दिग्रस नगरी कापसाची पंढरी
दिग्रस हा यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यांपैकी एक. दिग्रस हे शहर पूर्वी ‘डिग्रस’ म्हणून ओळखले जात असे. त्याचे दिग्रस हे नाव कसे पडले, याबाबत काही दंतकथा आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तेथील झाडापासून डिंकाचा रस जास्त मिळत असल्याने त्याचा अपभ्रंश डिग्रस असा झाला. कोणी ‘ग्रेसफुल’ अर्थाने, तर कोणी ‘दि ग्रेट’ अर्थाने दिग्रस या शब्दाचा अर्थ सांगतात. दिग्रस हे शहर यवतमाळपासून बहात्तर, अमरावतीपासून एकशेचौदा, तर नांदेडपासून एकशेअडतीस किलोमीटर अंतरावर आहे. दिग्रसने स्वत:चा वेगळा ठसा कृषी, राजकारण, कला, क्रीडा, अध्यात्म, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उमटवला आहे...