श्रीसातेरी

0
38

गोव्यातील प्रत्येक गावामध्ये एक देवी मंदिर असते. त्या मंदिरातील देवता मुख्य करून ‘श्री सातेरी’ या नावाने सर्वत्र ओळखली जाते. काही गावांतून मात्र तिला भूमिका, भगवती, माउली, वनदेवी या नावांनीही संबोधले जाते. गावाचे रक्षण करणारी जागृत देवता म्हणून तिची पूजा प्रत्येक गावी केली जाते.

प्रत्येक देवळामध्ये असलेले वारूळ हेच श्रीसातेरीचे प्रतीकात्मक स्वरूप मानले जाते व वारुळांची पूजाअर्चाही नित्यनेमाने करण्यात येते. त्या देवतेचा उत्सव प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. ज्या ठिकाणी श्रीसातेरीची मूर्ती (कळस) असेल त्या ठिकाणी मूर्तीची (कळसाची) मिरवणूक काढण्यात येते. त्या ग्रामदेवतेची मंदिरे साधीसुधी, निर्मळ व आकर्षक आहेत.

या स्त्रीस्वरूपी देवतेबरोबर ग्रामदेव म्हणून पुरूष स्वरूपातील वेताळ, रवळनाथ, भूतनाथ, भैरव, काळभैरव ह्यांचीदेखील उपासना काही गावांतून होते.

(कुलदैवत)

About Post Author