Home टीम थिंक महाराष्ट्र

टीम थिंक महाराष्ट्र

null

दिनकर गांगल

दिनकर गांगल हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संस्थापक संचालक आणि ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाइम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार, उषा मेहता, विजया चौहान यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती महाराष्‍ट्रात वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत त्‍यांनी ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके संपादित केली. ‘ग्रंथाली’ने वाचनवृत्ती म्हणजे ज्ञानजिज्ञासा हे ठामपणे मांडले आणि महाराष्ट्र समाज जाणकार, ज्ञानी व्हावा-असावा असा आग्रह धरला. गांगल यांनी ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ हे ‘ग्रंथाली’चे पुढील पाऊल/प्रगत रूप आहे असेच म्हटले आहे. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे गांगल यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन), ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ आणि ‘क्षितिज अपार’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना मुख्यत: महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे, वाङ्मयक्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’, जागतिक मराठी परिषदेचा ‘जीवनगौरव’ असे पुरस्‍कार लाभले आहेत.

null

प्रवीण शिंदे

प्रवीण शिंदे हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संचालक. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. शिंदे मुंबई येथील ‘शिंदे, नायक अँड असोसिएट्स’ या सीए फर्मचे भागीदार आहेत. ते त्या फर्मच्या माध्यमातून ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेचे लेखापरीक्षक म्हणून गेली तीस वर्षे काम पाहत आहेत. ते कायद्याचेही पदवीधर आहेत. त्यांचा व्यवसायानिमित्त विविध सामाजिक संघटनांचा अभ्यास आहे. ते काही संस्थांशी व उपक्रमांशी सद्वृत्तीने जोडले गेले आहेत. शिंदे मूळचे नाशिकचे. ते रसिक आहेत. त्यांचे वाचन वैविध्यपूर्ण आहे. ते पर्यटनाच्या आवडीतून भारतासह सिंगापूर, दुबई, अमेरिका, युरोप, सायप्रस, मोझांबिक, दक्षिण आफ्रिका असे अनेक देश फिरले आहेत.

null

गिरीश घाटे

गिरीश घाटे हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संचालक. ते ठाण्याचे रहिवासी. ते धातुशास्त्रातील पदवीधर असून त्यांच्या ‘डॅकोट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ व ‘आयजेन इंजिनीयर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्या आहेत. घाटे यांना इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज (नवी दिल्ली) या संस्थेने उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित (2015) केले आहे. घाटे हे सोलापूर जिल्ह्यातील यावली गावी ‘प्रभाकर फाउंडेशन’च्या वतीने माध्यमिक शाळा दहा वर्षे चालवत आहेत. घाटे रोटरी संस्थेचे सक्रिय सभासद आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनावर रोटरी तत्त्वांचा मोठा प्रभाव आहे. घाटे यांची ‘सांग ना समजेल का?’ (कविता संग्रह) आणि ‘रावसाहेब’ ही (चरित्रात्मक कादंबरी) पुस्तके प्रकाशित आहेत.

null

सुदेश हिंगलासपूरकर

सुदेश हिंगलासपूरकर हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संचालक. ते वयाच्या सोळाव्या वर्षापासून ‘ग्रंथाली’ वाचक चळवळीशी जोडले गेले. त्यांनी ‘ग्रंथाली’ वाचक चळवळीची धुरा २००८ सालापासून यशस्वीपणे सांभाळली. सध्या ते संस्थेचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘ग्रंथाली’ची पुस्तके, ‘शब्दरुची’ हे मासिक किंवा इतर कार्यक्रम कल्पकतेने पुढे नेले; त्यांना कायम स्वरूपी आधार निर्माण करून दिला. हिंगलासपूरकर यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर दोन हजारांहून अधिक पुस्तक प्रदर्शने भरवली आहेत. ते चंद्रपूर येथे १९७८ साली आयोजित केलेल्या साहित्य संमेलनापासून सर्व सुमारे पंचेचाळीस साहित्य संमेलनांत हजर राहिले आहेत. तसेच, ते अमेरिकेतील तेरा बीएमएम अधिवेशनांना उपस्थित राहिले आहेत. तेथे त्यांनी पुस्तक प्रदर्शनेही मांडली आहेत. ते त्यांना मराठी साहित्य-संस्कृतीचे अमेरिकेतील दूतही (अॅम्बॅसडर) म्हणता येईल, इतके तेथील मराठी जीवनाशी जोडले गेले आहेत. त्यांनी ‘ग्रंथाली’च्या माध्यमातून महाराष्ट्रात शंभराहून अधिक ग्रंथयात्रा काढल्या आहेत. त्यांनी ‘गांगल ७०, ग्रंथाली ३५’ या पुस्तकाचे संपादन व निर्मिती दिनकर गांगल यांच्या सत्तरीनिमित्त केली. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ग्रंथाली’ने भारतातील आणि भारताबाहेरील लेखकांची शेकडो पुस्तके प्रकाशित केली. हिंगलासपूरकर यांना उत्कृष्ट कल्पनेचा ‘म.टा. सन्मान’ पुरस्कार (२००६), संत रोहिदास सामाजिक न्याय पुरस्कार (२००८), उत्कृष्ट संपादनासाठीचा ‘आशीर्वाद पुरस्कार’ (२०११), नाशिक साहित्य संमेलनाचा प्रकाशक पुरस्कार इत्यादी सन्मान लाभले आहेत.

null

यश वेलणकर

डॉ. यश वेलणकर हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संचालक. त्यांनी बी.ए.एम.एस पदवी मिळवली आहे. त्यांचे मानसोपचार आणि तत्त्वज्ञान अशा दोन विषयांत पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. ते ‘माईंडफुलनेस’ म्हणजे सजगता या विषयाचे अभ्यासक आणि प्रसारक आहेत. ते ‘आरोग्यसंस्कार’ या मासिकाचे संपादक होते. वेलणकर यांनी लिहिलेली नऊ मराठी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांतील ‘ध्यान विज्ञान’ या पुस्तकाला ‘मसाप’चा ‘सोनोपंत दांडेकर पुरस्कार’ (२०१७) लाभला. ते ‘तुमच्या आमच्या घरात’ आणि ‘दिल की बात’ असे ‘स्टेज शो’ सादर करतात. वेलणकर ताणतणाव व्यवस्थापनासाठी सजगता या विषयावर कार्यशाळा घेतात.

null

राजीव श्रीखंडे

राजीव श्रीखंडे हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संचालक. ते ‘श्रीखंडे कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते अॅप्रेंटीस म्हणून 1986साली त्या कंपनीत रुजू झाले. त्यांनी कंपनीच्या अनेक यशस्वी प्रकल्पांसाठी मुख्य सल्लागार, कार्यकारी संचालक आणि संयुक्त प्रकल्प प्रमुख म्हणून जबाबदारी निभावलेली आहे. त्यांनी कंपनीचे नेतृत्व प्रकल्प आणि करार व्यवस्थापन, तांत्रिक लेखापरीक्षण आणि वाहतूक, सिंचन इत्यादीसारख्या विविध सेवा प्रदान करण्यात केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने अनेक मोठे पायाभूत प्रकल्प राबवण्यासाठी जगप्रसिद्ध बहुराष्ट्रीय सल्लागार कंपन्यांशी संघटन प्रस्थापित केले आहे. त्यांना जगभरातील पुस्तके वाचण्याचा ध्यास आहे. त्यांच्या घरी जगातील विविध तऱ्हांची नऊ हजारांहून अधिक पुस्तके, मुख्यत: इंग्रजीतील आहेत. ते सध्या ‘ग्लोबल साहित्यसफर’ हा ऑनलाईन कार्यक्रम ‘ग्रंथाली’साठी सादर करतात.

null

धनंजय गांगल

हे व्यवसायाने माहिती तंत्रज्ञान (आयटी) तज्ज्ञ व एरॉनॉटिकल इंजिनीयर आहेत. ते ‘अश्वमेध इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड’चे सहसंस्थापक आहेत. धनंजय गांगल मराठीतील प्रख्यात सामाजिक-राजकीय विश्लेषक, लेखक, संपादक व कार्यकर्ते आहेत. धनंजय हे ‘ग्रंथाली’त 1993 मध्ये सामील झाले, नंतर ते ‘ग्रंथाली’चे विश्वस्तही बनले. ते ‘ग्रंथाली’चे सचिव 2006 पासून आहेत. त्यांनी ‘शब्दरुची’ हे ‘ग्रंथाली’चे मासिक संपादित केले आहे आणि अनेक वेळा त्यात संपादकीयही लिहिले. धनंजय हे एक जिज्ञासू व माहीतगार वाचक असून त्यांनी विविध विषयांवर शेकडो पुस्तके वाचली आहेत. त्यांनी सामाजिक-राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळ सारख्या मराठी दैनिकांसाठी लेख लिहिले आहेत. तसेच, टीव्ही वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. इंटरनेटच्या जाळ्यात खोलवर घुसून अचूक संदर्भ, माहिती व छायाचित्रे मिळवून द्यायची ही त्यांच्या अभ्यास संशोधनाची खासीयत आहे.

शिक्षकांचे व्यासपीठ

null

शिल्पा खेर

शिल्पा खेर या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या त्यांच्या ‘भाग्यश्री फाउंडेशन’तर्फे विविध शैक्षणिक उपक्रम करत असतात. त्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या शिक्षक व्यासपीठाच्या संयोजक आहेत. त्यांचे ‘यश म्हणजे काय?’ ही पुस्तकमाला गाजत आहे. त्यामध्ये त्यांनी मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतीआधारे यशाचे गमक उलगडून दाखवले आहे. त्यांनी ‘सक्षम नागिरक मोहीम’ या नावाचा प्रकल्प शाळाशाळांतून चालवला आहे. ती मोहीम अवघ्या महाराष्ट्राचे शैक्षणिक जीवन ढवळून काढील अशी योजना आहे.

पूर्णवेळ कार्यकर्ते

null

नितेश शिंदे

नितेश शिंदे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरिंग आणि एम ए (मराठी) असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘लघुनाटके’ लिहिली. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांनी ‘आशय’ या नियतकालिकाच्या ‘मुंबई’, ‘पु.ल.देशपांडे’ आणि ‘त्रिवेणी’ या विषयांवरील विशेषांकांचे संपादन केले आहे. नितेश यांना ‘के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुंडट ऑफ द इयर’ (2017) हा पुरस्कारही मिळाला आहे.

null

राजेंद्र शिंदे

राजेंद्र शिंदे हे जिज्ञासू वाचक आहेत. ते डीटीपीचे काम करतात. ते आधी ग्रंथाली वाचक चळवळीशी व नंतर ‘थिंक महाराष्ट्र’च्या आरंभापासून त्या कामाशी जोडले गेले आहेत.

भागधारक

चंद्रशेखर रेडे, सुषमा बर्वे, श्रीकांत पेटकर, नंदिनी सुधीर थत्ते, मकरंद कर्णिक, किरण भिडे, दिलीप करंबेळकर, अविनाश बर्वे, श्रीपाद हळबे, अपर्णा सांडू, माधवी मेहेंदळे, सुर्यकांत कुलकर्णी, सुरेश लोटलीकर, जयंत धर्माधिकारी, संध्या जोशी, शशिकांत तांबे, उषा तांबे, आनंद सांडू, शशिकांत बर्वे, मानस बर्वे, राजेंद्र पाटकर, ज्ञानदा आठवले, संजय आचार्य, वसंत लिमये, श्रीरंग पाध्ये, मोहन देशमुख, राजेश पाटील, गिरीश देसाई, विलास ढवळे, व्ही. आर. जोशी.

संपादकीय व लेखन सहाय्य

सुनंदा भोसेकर, राणी दुर्वे, आर्या जोशी, मेधा सिधये, संध्या जोशी, रेखा नार्वेकर, अनुपमा उजगरे, मेघना साने, शुभा खांडेकर, विनीता वेल्हाणकर, नगिना माळी, ज्योती निसळ, अनिल कुलकर्णी, श्रीकांत पेटकर, किरण भावसार, राम देशपांडे, प्रल्हाद कुलकर्णी, संतोष खेडलेकर, अमित पंडित, गोविंद मोरे, अशोक लिंबेकर, गोपाल शिरपूरकर, अनिरुद्ध बिडवे, रोशनकुमार पिलेवान, राजा पटवर्धन, वैभव धनावडे, मुकुंद वझे इत्यादी…

null

सुनंदा भोसेकर

सुनंदा भोसेकर यांना भाषा विकास आणि संस्कृती यांच्या अभ्यासात आणि प्रवासात विशेष रस आहे. त्यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये वाचन आणि संस्कृतीविषयक सदर लेखन केले आहे. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले असून तिसरा प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

null

राणी दुर्वे

राणी दुर्वे या आघाडीच्या ललित लेखिका त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे वाचकप्रिय आहेत. प्रवास आणि माणसांचे आपसातील नातेसंबंध हे त्यांच्या लेखनाचे विषय आहेत. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी एक 1960 नंतरच्या जागतिक नवसिनेमाविषयी आहे.

देणगीदार

अशोक दातार, महाराष्ट्र फाउंडेशन, धारप असोसिएट्स, भवरलाल जैन (जैन इरिगेशन), एकनाथ ठाकूर (सारस्वत बँक), वसुमती धुरू, एस बी आय बँक, विवेक सावंत (एमकेसीएल) डॉ. पी.एस. रामाणी.

पुण्याच्या ‘एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन’ या संस्थेचे अर्थसहाय्य ‘थिंक महाराष्ट्र’च्या माहिती संकलन मोहिमेस लाभत असते. विवेक सावंत व उदय पंचपोर यांना ‘थिंक महाराष्ट्र’च्या कामात विशेष आस्था आहे. ‘माहिती संकलन मोहिम २०२२’ या मोहिमेला ‘परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन’चे अर्थसहाय्य मिळाले आहे.