कबीर बेदीची आई फ्रेडा बेदी. फ्रेडावर दोन पुस्तके आहेत. ती जेव्हा कांगडा जिल्ह्यातील आंद्रेत्ता येथे राहण्यास गेली तेव्हा तिला नोरा रिचर्ड्स नावाच्या आयरिश अभिनेत्रीने मोकळी जमीन दिली. फ्रेडाने तिचे घर तेथे उभे केले. साहजिकच, उत्सुकता निर्माण झाली की ही नोरा कोण? ती हिंदुस्तानात का आणि केव्हा आली होती? आणि ती अभिनेत्री होती तर तिने कांगडासारख्या दूर, निसर्गरम्य जिल्ह्यात राहण्याचे का ठरवले ?