Home Tags Temples

Tag: Temples

हिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक उपचारातील साम्य

1
भारतातून हज यात्रेला हजारो भाविक दरवर्षी जातात. त्यांना सरकारने देऊ केलेल्या सवलतींच्या बातम्या व त्यावर प्रतिकूल किंवा अनुकूल प्रतिक्रिया वृत्तपत्रांतून छापून येतात. मात्र त्या वार्तांतून हिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक आचारात असलेले साम्य कधी समोर येत नाही. ते रामचंद्र वझे यांना सुलतान जहाँ बेगमच्या हज यात्रेच्या वृत्तांतात वाचण्यास मिळाले...

मुखवट्यातून उभ्या केलेल्या चार देवींची यात्रा

मुरूड, आंजर्ले व वेळास ही गावे दुर्गादेवीच्या, तर केळशी महालक्ष्मीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. ती चारही गावे तीनशे वर्षांपासून या यात्रांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत. यात्रांच्या शेवटच्या दिवशी रथयात्रा निघते, त्या दरम्यान प्रत्येक जातीजमातीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला मानाचा विडा देऊन सन्मानित करण्याची रीत आहे. विनायक बाळ यांनी दापोली तालुक्यातील या चार गावांत मुखवट्यातून उभ्या करण्यात येणाऱ्या चार देवींच्या यात्रांचे वेगळेपण या लेखातून मांडले आहे...