शहाबाजहे रायगड जिल्ह्यातील तीनचार हजार लोकवस्तीचे छोटे गाव, पण ते शिक्षणक्षेत्रातील प्रसिद्धीने खूप मोठे झाले. त्या खेड्याने रायगड जिल्ह्याला शिक्षकांचा पुरवठा सतत केला. शहाबाज गावाने त्याचे वेगळे स्थान आगरी समाजाच्या चळवळीचे व सुधारणांचे उगमस्थान म्हणूनही निर्माण केले आहे.