Home Tags Nagpur

Tag: Nagpur

नागपूरचे जुने मध्यवर्ती संग्रहालय

नागपूरचा ‘अजब बंगला’ म्हणजे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय. त्या म्युझियमची स्थापना इंग्रज सरकारने 1863 मध्ये केली. ते भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांमध्ये गणले जाते. नागपूर शहर हे त्यावेळी मध्यप्रांत आणि वऱ्हाड यांची (Central Province And Berar) राजधानी होती. संग्रहालयात दहा दालने आहेत. त्यांत विविध प्रकारचे पुरावशेष, झाडांचे जीवाश्म, शिल्पे, चित्रे, भुसा भरलेले प्राणी, शिलालेख अशा अनेकविध वस्तू आहेत. त्याकरता संग्रहालयात वेगवेगळी दालने आहेत- निसर्गविज्ञान, पाषाणशिल्पे, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती, प्राणी, पक्षी व सरीसृप, शस्त्र, हस्तशिल्प कला, चित्रकला व नागपूर हेरिटेज अशा विषयांचा त्यांत समावेश आहे...

अचलपूरचा समाजसुधारक कलावंत – राजा धर्माधिकारी

अचलपूरच्या सांस्कृतिक विश्वातील हरहुन्नरी हास्य कवी, कलाकार राजा धर्माधिकारी म्हणजे दिलखुलास गप्पांचा धबधबाच ! नर्म विनोदी कोट्या करून वातावरण हलकेफुलके करण्याची त्यांची लकब मनाला भावते. ते हातचे काही न राखता भरभरून बोलत असतात, तो वऱ्हाडी संभाषणाचा नमुनाच ठरून जातो...
_Vinod_Hande_1.png

मी आणि माझे जलसंवर्धनाचे प्रयोग

1
मला मी नोकरीमध्ये असताना असे कधी वाटले नव्हते, की मी जलसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि पर्यावरण या विषयांवर बोलू शकेन व लिहू  शकेन! पण...