Home Tags Kasheli

Tag: Kasheli

आमची कशेळी – शहरी वातावरणापासून दूर !

कशेळी हे कोकणातील रत्नागिरीजवळचे जुने प्रसिद्ध गाव. ते कऱ्हाड्यांचे गाव असेही म्हणत. तेथील पाच ‘क’ प्रसिद्ध आहेत, म्हणे. त्यांतील एक ‘क’ कऱ्हाड्यांचा. गावगाथा या ‘थिंक महाराष्ट्र’च्या लोकप्रिय सदरासाठी लेखन शोधत असताना न्यूयॉर्कचे जयंत कुळकर्णी यांच्यापर्यंत पोचणे झाले आणि खजिनाच हाती आला. जयंत स्वतः उत्साही लेखक-संकलक. त्यांचे वडील वि.ह. हे समीक्षक कुळकर्णी वर्गातील. पण वि.ह. ललित लेखनही उत्तम लिहीत. त्या वि.ह. यांनी त्यावेळच्या साहित्यिक समीक्षकांची ट्रीप कशेळीला नेली होती. तिचे वर्णन अनंत काणेकर यांनी करून ठेवले आहे. कुळकर्णी पितापुत्र यांनी कशेळीबद्दल लिहिले आहे...

कशेळीचे आम्ही कुळकर्णी

आमच्या कुळकर्णी घराण्याची श्रीमंती खूप होती. त्याची ख्याती जंजिऱ्यापर्यंत पोचली होती. सिद्दी चाचे लुटमार करण्याकरता कशेळी येथे 1870 साली समुद्रावरून आले होते. त्यांनी वाड्यात येऊन स्त्रियांच्या वस्त्रांसकट दागदागिन्यांची लुटमार केली होती. मात्र, एका धाडसी कुळकर्णी महिलेने हाताला लागेल तेवढे सोने अंगावर घालून जवळच्या विहिरीत उडी मारली. ती चाचे जाईपर्यंत तेथेच दडून बसली होती. त्यामुळे ती वाचली. तिच्या अंगावर सोने इतके होते, की त्यातून मिळालेल्या पैशांवर पुढे कुळकर्ण्यांच्या चार पिढ्या जगल्या. परंतु श्रीमंती गेली होती...

अमृत्या – आमच्या कशेळीचा फणस

माझे आजोबा म्हणत, ’अमृत्या खाशी, त्याची कीर्ती वीस कोशी’. दरवर्षी त्याला खूप फणस लागतात. हा लाल मातीचा गुण असावा. कशेळी गाव तिन्ही बाजूंनी पसरलेल्या अथांग अरबी समुद्राच्या कुशीत उतरत्या डोंगरात शांत वसलेले आहे. त्या गावात 1661 मध्ये शिवाजी महाराजांचे आगमन झाले होते ! गावात कऱ्हाडे ब्राह्मणांची वस्ती जास्त आहे. आमच्या आगरातील बरक्या फणसाचे वैशिष्टय असे, की त्याचे गरे रसाळ व चवीला अमृतासारखे गोड लागत. म्हणून आमच्या पूर्वजांनी त्याला ’अमृत्या’ असे योग्य नाव दिले होते...

कशेळीचा कनकादित्य (Kanakaditya the sun temple from Kasheli)

0
सूर्यमूर्ती या भारतात इसवी सनापूर्वी दोन शतकांत घडवण्यात येऊ लागली. सूर्याचे देव म्हणून महत्त्व इसवी सनाच्या चौथ्या, पाचव्या शतकात, म्हणजे गुप्त काळात वाढत गेले आणि उपासना मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी या गावी ‘कनकादित्य’ नावाने सूर्य मंदिर प्रसिद्ध आहे. ते मंदिर सुमारे एक हजार वर्षे पुरातन आहे. कशेळी गावाजवळ असलेले आडिवरे गाव मुचकुंदी नदीच्या खाडीच्या मुखाशी वसलेले आहे. आडिवरे या नावाची उपपत्ती आदितवाड म्हणजे जेथे सूर्योपासना होती ते गाव अशी असल्याचे पुरातत्त्व खात्याच्या संशोधन पत्रिकेत म्हटले आहे...