Home Tags Harakhachand Sawala

Tag: Harakhachand Sawala

carasole

हरखचंद सावला यांची ‘जीवनज्योत!’

हरखचंद सावला यांचे व्यक्तिमत्त्व परळ येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या परिसरात राहणाऱ्यांना नवीन नाही. पांढरा शुभ्र पायजमा-कुर्ता, प्रसन्न चेहरा ही त्यांची पहिली ओळख. ते कर्करोगग्रस्तांची व त्‍यांच्‍या नातेवाईकांची आस्थेने चौकशी करून त्यांना आधार देत असतात. ते कर्करोग्यांचे आधारवड बनले आहेत. त्यांचे माध्यम ‘जीवनज्योती’ हा ट्रस्ट! त्‍यांनी शेकडो रुग्णांना नवी आशा दिली आहे. त्यांनी रुग्णसेवेचा यज्ञ परळ भागात गेली तीस वर्षें अव्याहतपणे धगधगता ठेवला आहे...