‘अनुपमा’ हे अनागारिका माताजी अनुत्तरा म्हणजे पूर्वाश्रमीच्या अनुपमा अर्जुन बोरकर लिखित आत्मकथन आहे. ते आंबेडकरी चळवळीतील स्त्री आत्मभान जपणारे पुस्तक आहे. त्यात आंबेडकरी चळवळ, शैक्षणिक परिवर्तन, सामाजिक-धार्मिक परिवर्तन यांचा ऐतिहासिक संदर्भ येतो आणि त्यामुळे ते महत्त्वाचे ठरते...