ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांची वनस्पती क्षेत्राच्या एनसायक्लोपिडिया अशी ओळख होती. त्यांनी आयुष्यभर निसर्गाशी एकरून होऊन राहण्याची जीवनशैली सांभाळली. त्यांनी पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी राहूनही शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. त्यांनी मनुष्य विजेशिवायही राहू शकतो, हे स्वतःच्या जगण्यातून लोकांना दाखवून दिले. त्यांनी दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तके लिहिली...