फलटण संस्थानामध्ये एकोणिसाव्या शतकात वाचनालयाची स्थापना झाली. ती कामगिरी संस्थानचे अधिपती मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांची. तेव्हा तिला ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे म्हटले गेले. स्थापना दिन आहे 9 ऑगस्ट 1870. म्हणजे लायब्ररीला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. तालुका पातळीवरील वाचनालय हे त्या काळी अप्रूप होते. मुधोजीराजांनी दोन हजारांपेक्षा अधिक ग्रंथ वाचनालयात संग्रहित केले. ते जुने ग्रंथ हे त्या वाचनालयाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ते ग्रंथ जतन करण्यात आले आहेत...
कॉ.हरिभाऊ निंबाळकर हे फलटण नगरपालिकेपासून राज्याच्या विधानसभेपर्यंत, कामगारांच्या विविध प्रश्नांपासून अनेक क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी लढणारे झुंजार व्यक्तिमत्त्व होते. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा आमदार होते...