Home Tags स्मिता कोल्हे

Tag: स्मिता कोल्हे

शोध स्वधर्माचा-रवींद्र व स्मिता कोल्हे

माणसाचे विहीत कर्म म्हणजे त्याचा स्वधर्म, असे विनोबा म्हणायचे. माणसाला स्वधर्माचा शोध एकदा लागला की त्याच्या आयुष्याला जणू सुगंध येतो! या स्वधर्माच्या शोधात अनेकांची आख्खी आयुष्ये पालथी पडतात. स्वधर्म जर गवसला नाही तर आयुष्य म्हणजे अनेक अपयशी प्रयत्नांचे जणू गाठोडे होऊन बसते. पण हा स्वधर्माचा शोध सोपा नसतो. या शोधाचे पांथस्थ असलेले असेच एक ध्येयवेडे दांपत्य म्हणजे डॉ. रवींद्र व सौ. स्मिता कोल्हे. एम.बी.बी.एस., एम.डी. असलेला हा माणूस निष्ठेने खेडयात राहून आदिवासींच्या प्रश्नांचा अभ्यास करत आहे. ते सोडवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा शोध घेत आहे...