ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्रीपुरूष तुलना’ हा निबंध सन 1882 मध्ये प्रकाशित झाला. एका विधवा स्त्रीने केलेल्या भ्रूणहत्येमुळे खवळून उठलेल्या आणि त्या स्त्रीला धारेवर धरणाऱ्या समाजावर धारदार लेखणीने ताराबाईंनी या निबंधात अक्षरश: कोरडे ओढले आणि त्यावर मीठही चोळले. हिंदू शास्त्र-पुराणांविषयी आणि देवादिकांविषयी तर त्यांचे विचार असे जहाल आहेत की ते वाचताना आज त्या हयात नाहीत हे लक्षात येऊन हायसे वाटते. त्या स्वदेशी उद्योगधंद्यांच्या -हासाचीही चिकित्सा करतात...