Tag: सुरतशहाअली दर्गा
वैभवशाली लातूर (Latur’s cultural affluance)
मला लातूर, कानापूर-मोहा आणि मुंबई ही गावे व्यक्तिगत जिव्हाळ्याची वाटतात. लातूर हे माझे जन्मगाव. लातूर सध्या शिक्षणवर्गांसाठी ‘लातूर पॅटर्न’ म्हणून गाजत असते. माझे लातूरशी भावनिक नाते आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथे झाले. बीड जिल्ह्यातील कानापूर-मोहा हे माझे वडिलोपार्जित गाव. मी उच्च शिक्षण व व्यवसायक्षेत्र म्हणून मुंबई महानगराशी ममत्वाने जोडला गेलो आहे. देश आणि राज्य स्तरावर नोंद घेता येईल असा भौगोलिक वा नैसर्गिक समृद्धीचा वारसा न लाभलेले लातूर गाव ! मात्र ते भूकंपामुळे सर्व जगास परिचयाचे झाले. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असल्याने लातूर गावाचा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन आढावा घेत आहे. लातूर गावास प्रागैतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ती तेथे प्राप्त झालेल्या शिलालेखांतून सिद्ध होते...