अल्तापहुसेन रमजान नबाब यांचा सुंता विधीबाबतचा लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर वाचून एक किस्सा लिहावासा वाटला. हिंदुस्थानी माणसाने इंग्रजीत लिहिलेले पहिले पुस्तक आयर्लंडमध्ये अठराव्या शतकाअखेरीस प्रकाशित झाले (1794). साके दीन महोमेत या भारतीय माणसाने ते पुस्तक लिहिले होते. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत कॅम्प फॉलोअर या हुद्यावर काम करत होता. ते पुस्तक पत्ररूपात आहे.