करावेगाव हे ठाणे जिल्हा आणि ठाणे तालुका यांच्या दक्षिण टोकाला आहे. गावाच्या पश्चिमेस ठाणे खाडी तर दक्षिणेस पनवेल खाडी येते. करावेगाव हा संपूर्ण आगरी समाजाचा गाव होता. ते लोक खाडीत मासेमारी करत असत. तेथे कोलंबी, बोईस, चिंबोरी, जिताडा, कोत, पाला असे चवदार मासे आणि खेकडे मिळत. गावकरी कष्टकरी होते. ते चारपाच मैल अंतर सहज कशासाठीही चालत जात असत. करावेगावाच्या पाठीमागून ‘पाम बीच’ हायवे गेला आहे. सिडको प्रशासनाने बेलापूर आणि करावेगाव यांच्यामधील खाडीकिनारी आधुनिक जेटी तयार केली आहे. तेथून खाडीमार्गे जलवाहतूक होईल असे अपेक्षित आहे. करावेगावाच्या ईशान्य भागात ‘सीवूड’ रेल्वेस्थानक आहे...