Tag: सिंधी निर्वासित
स्थलांतरित आणि निर्वासित (The difference between immigrants and Refugees)
मानववंश आफ्रिकेत लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाला. मानवी समूह तेथे घडून तेथून जगभरातील अनेक भूखंडांत स्थलांतरित झाले. त्या समूहांनी तेथे तेथे रहिवास करून त्या त्या ठिकाणाला त्यांची जन्मभूमी मानले. त्यातूनच पुढे, अनेक वेगवेगळ्या भूभागांमध्ये संस्कृती विकसित होत गेल्या आणि तेथे यथाकाल देशांची निर्मिती झाली- देशांच्या सीमा ठरल्या गेल्या. तो विकास समूह व्यवस्था(पन), ग्राम व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि राष्ट्र व्यवस्था असा सांगितला जातो. त्यातूनच एकेकट्या कुटुंबांची प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील अधिसत्ता निर्माण झाल्या. ती राजेशीही होय. राजेशाहीचा अस्त जगातील बहुतांश देशांत एकोणिसाव्या व विसाव्या शतकात होऊन लोकशाही सत्ताप्रणाली जगभर प्रस्थापित झाली...
कथा कोल्हापूरातील पोलिश आश्रितांची – गांधी नगरची (Polish migrants during II world war in...
हिटलरचा प्रभाव पोलंड, हंगेरी, झेकोस्लाव्हाकिया वगैरे देशांत वाढू लागला तसतसे तेथील नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने स्थलांतरित झाले व दोस्त राष्ट्रांच्या आश्रयाला आले. इंग्लंडच्या आश्रयास आलेल्या पोलिश लोकांना भारतात आणून त्यांची व्यवस्था कोल्हापूरजवळ वळिवडे कँपात केली गेली. जो परिसर आता गांधीनगर म्हणून ओळखला जातो...