Home Tags साष्टांग नमस्कार

Tag: साष्टांग नमस्कार

रमेश बाळापुरे – ना हरली जिद्द ! (Ramesh Balapure – stage actor with determination)

0
रमेश बाळापुरे यांचा जन्म झाला तो मुळी बाविशी नाट्यमंदिरात. रमेशला त्याच्या तरुणपणीही बाविशीचे स्टेज अनायासे प्राप्त झाले ! रमेशचे मामा लगदेमास्तर हे नाटकात कामे करत. रमेशमध्ये नाटक असे अनुवंशिकतेने उतरले होते. रमेशला निसर्गानेसुद्धा मदतच केली. त्याला प्रमाणबद्ध उंची, मोठे आकर्षक डोळे, हसरा चेहरा अशी शारीरिक संपत्ती लाभली. रमेश आणि मी नाटकातील जोडगोळी बनलो. रमेशने नाटक निवडावे- दिग्दर्शित करावे आणि मी त्यात विनोदी भूमिका करावी असा परिपाठ झाला...

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

0
मराठी संस्कृतीचा झळाळता प्रासाद राजकारण, समाजकारण, नाटक, वक्तृत्व आणि पत्रकारिता या पाच प्रमुख स्तंभांवर तोललेला आहे. महाराष्ट्रात कर्तृत्वसंपन्न व्यक्ती त्या एकेका क्षेत्रात होऊन गेलेल्या आहेत. पण एकाच व्यक्तीच्या अंगी हे सारे पैलू असलेली प्रतिभावान व्यक्ती म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे ...

बाळ भालेराव – साहित्य संघाचा प्राण (Bal Bhalerao – Doctor Who Devoted His Life...

विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दादरच्या (मुंबई) राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भरले होते. त्यात एका संध्याकाळी ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक रंगले होते. काम करणारे सगळे होते पत्रकार! दिग्दर्शक होते विहंग नायक. नायिकेच्या भूमिकेत वसुंधरा पेंडसे अन् त्यात छोट्या चंदूची भूमिका केली होती विहंगच्या मुलाने. संमेलनात पत्रकारांचे नाटक असावे ही संकल्पना डॉ. बाळ भालेराव यांची. त्या संबंधातूनच पुढे भालेराव यांनी विहंग यांना साहित्य संघाच्या नाट्यशाखेत ओढून घेतले. वेगळी, अनोखी संकल्पना राबवणे, माणसांना पारखून संस्था मोठी करणे आणि स्वत:च्या डॉक्टरी पेशाचा/पैशांचा आधार नाट्यसृष्टीतील असंख्यांना देणे ही बाळ भालेराव यांची वैशिष्ट्ये...