Home Tags सातारा

Tag: सातारा

सातारा

for frame

क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil)

‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. ते 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव) खेड्यात जन्मले. ते तेथेच व्हर्नाक्युलर फायनल ही त्या काळी असणारी मराठी सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. तेव्हा त्यांनी तलाठ्याची नोकरी पत्करली. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव होता नंतर ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते बनले. त्यांनी नोकरी सांभाळत गावोगावी सभा घेऊन समविचारी तरुणांच्या संघटना बांधल्या. ते आपले भाषण रोजच्या व्यवहारातील दाखले, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी शैली, विनोदाची पेरणी यांच्या आधारावर प्रभावी करत. त्यामुळे ते साहजिकच लोकप्रिय वक्ते झाले...

पुसेगावचा रथोत्सव

4
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला, सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साजरा केला जातो. सेवागिरी महाराजांनी त्यांचे कार्य संपल्यानंतर (10 जानेवारी 1948 या दिवशी,...
carasole

क-हाड नगरीचे ग्रामदैवत: श्री कृष्णाबाई

कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमाने पुनित झालेल्या कराड नगरीचे नाव भारतात अनेक दृष्टींनी प्रसिद्ध आहे. नगरीला तिन्ही बाजूंनी कृष्णा व कोयना या नद्यांनी वेढलेले आहे. या नद्यांच्यामुळे कराड...
top_images7

ज्याचा त्याचा विठोबा

‘धामणेर’, ‘निढळ’ आणि ‘लोधवडे’... ग्रामस्वच्छता अन् निर्मल ग्राम अभियानात रोल मॉडेल ठरलेल्या या खेड्यांमध्ये, किंबहुना, ढोबळ बोलायचं तर सार्‍या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवाराच्या पंढरीतला हिरवा विठ्ठल पाण्यावाचून करपला म्हणून मरणाची वारी करणारा बळीराजा मला दिसला नाही!....उलट, इथं मस्कतला डाळींब निर्यात करणारा निरक्षर साधाभोळा शेतकरी भेटला… घोटभर पाण्यासाठी पाखरागत वणवण हिंडणार्‍या लेकीबाळी भेटल्या नाहीत ... उलट, इंडो-जर्मन प्रकल्प अन् जलस्वराज्य योजनेतून तंत्रशुद्धपणे घालून दिलेले पाणीव्यवस्थापनाचे आदर्श भेटले… एरवी शाहरुखचा ‘स्वदेस’ थिएटरमध्ये बघताना भारावलेला अन् प्रत्यक्षात उच्च शिक्षण घेऊन फॉरेनला त्यातल्या त्यात शहरात जायची स्वप्नं बघणारा तरुण इथं भेटला नाही...

आदर्श मोठे – विकसनशील छोट्यांसाठी

मी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या तालुक्याच्या शहराचा मूळचा रहिवासी. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील एकसळ नावाच्या छोट्याशा खेडेगावात 1992पासून माझे स्थायिक होणे हा केवळ...