Tag: सर्पमित्र
वर्ध्याचे पुलगाव : माझे माहेरगाव (Pulgaon of Wardha – My childhood)
माझे पुलगाव हे माझ्या जिवाभावाचे गाव. या गावाशी असलेले माझे नाते अजोड आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे त्या गावाने पाहिले आहेत. माझे लहानपण, शिक्षण, लग्न या महत्त्वपूर्ण दिवसांचे ते साक्षीदार आहे. म्हणूनच पुलगाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी त्या गावाशी असलेली माझी नाळ तुटलेली नाही. त्या गावाने मला आयुष्यभराचा लळा लावला आहे. ‘सेंट्रल अॅम्युनेशन डेपो’ हे पुलगावचे वैशिष्ट्य आहे. त्या डेपोमुळे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले...
दापोलीतील सर्पसृष्टी (Serpents in Dapoli)
दापोली हा डोंगराळ व वनसृष्टीने बहरलेला तालुका असल्याने तेथील रहिवाशांना सर्पसृष्टीचा सहवास व भीतीही सतत राहिलेली आहे. भारताची जीवनशैली निसर्गानुकूल असली तरी वनस्पती व प्राणी सृष्टीविषयी लोकांमध्ये खास प्रेम, आस्था दिसून आली नव्हती. ती पर्यावरणीय जाणीव आधुनिक काळात आली व पसरत गेली. तशी ती दापोलीतही तीन दशकांपूर्वी सारंग ओक यांच्या निमित्ताने आली. ते व्यवसायानिमित्ताने आले आणि त्यांनी तेथे सरपटणारे प्राणी वनसृष्टीत पुन्हा सोडण्याची गरज पटवून दिली आणि बघता बघता त्यांची सर्पमित्रांची ‘टीम’ जमली. त्यात किरण करमरकर, सुरेश खानविलकर, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अरविंद व अनुप देशमुख हे पितापुत्र अशी पाच-सात मंडळी उत्तम तयार झाली...
यवतमाळचे सर्पमित्र श्याम जोशी
श्याम गोविंदराव जोशी म्हणजे यवतमाळमधील विशेष व्यक्ती आहेत. ते वयाच्या चौदाव्या वर्षांपासून सेहेचाळीस वर्षें सर्पांच्या राज्यात रमून गेले आहेत. जिल्ह्यात कोठेही साप निघाला तर...
निसर्गमित्र वासुदेव वाढे
वासुदेव वाढे यांची जळगाव शहरात सर्पमित्र म्हणून ओळख आहे. वासुदेव बीएस्सी करत असताना ते लहान साप पकडत. तसे करत करत त्यांनी विषारी, बिनविषारी साप...
सर्पमित्र दत्ता बोंबे
कल्याणचे 'दत्ता बोंबे' यांची सर्पमित्र म्हणून ख्याती आहे. ते लहानपणापासून मासे पकडण्याचे शौकिन होते. ते यशस्वी गिर्यारोहकसुद्धा आहेत. त्यांनी स्वत: अनेक ठिकाणी गिर्यारोहण केले आहे आणि इतरांनादेखील गिर्यारोहणाचे धडे दिले आहेत. त्यांनी त्यांचे आयुष्य पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यासाठी खर्च केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही...
गुणवंत राजेंद्र काकडे
राजेंद्र काकडे हे उत्तर सोलापूर तालुक्यात जमशापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळत विविध छंद जोपासले. त्यांपैकी साबणावर विविध प्रतिमा...