शिमग्याच्या म्हणजेच होळीच्या सणाच्या उत्सवातील ‘पिसईचा नकटा’ दापोलीत लोकप्रिय आहे. नकटा म्हणजे देवीचा रखवालदार. नकट्याचे सोंग घेणारी व्यक्ती लाकडी मुखवटा घालते. तो मुखवटा काजूच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला असतो. तो परंपरेने चालत आलेला असतो. नकट्याचा मुखवटा पोराबाळांना भीतीदायक वाटतो...
पिसई गावचे सरपंच वसंत येसरे कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून गावाच्या विकासासाठी क्रियाशील आहेत. त्यांनी पिसई गाव हे सुजलाम सुफलाम व्हावे, यासाठी जलव्यवस्थेची चोख कामे केली आहेत. ते सरकारी योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी तत्पर असतात...