यवतमाळ येथे 1973 साली झालेल्या एकोणपन्नासाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘गीतरामायण’कार ग.दि. (गजानन दिगंबर) माडगूळकर ऊर्फ गदिमा. ‘गदिमा’ हे केवळ ‘गीतरामायण’ एवढे अप्रतिम काव्य लिहून साहित्यविश्वात अजरामर झाले असते. ते प्रासादिक, प्रतिभाशाली आणि प्रसन्न असे गीतकार होते. त्यांच्या गीतरचनेला कवितांचा दर्जा लाभला. त्यांच्या पटकथा-संवादांनीदेखील मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः चमत्कार केला !माडगूळकर हे कोठल्याही मैफिलीचा ताबा घेत असत...