'संयुक्त मानापमान' या संगीत नाटकाचा प्रयोग हे मराठी रंगभूमीवरील एक विलक्षण 'घटित' होते. तो प्रयोग 8 जुलै 1921 रोजी मुंबईच्या बालीवाला थिएटरमध्ये रंगला होता. त्या प्रयोगाला अनेक व्यक्ती, घटना, प्रेक्षकांच्या क्रियाप्रतिक्रिया, निर्माण झालेला माहोल यांचे संदर्भ आहेत...