आम्ही एक सांगीतिक कार्यक्रम घेऊन फ्लोरिडामधील मराठी मंडळ टॅम्पा बे येथे गेलो होतो. तेथे स्थानिक गायिकेचा शोध घेतला असता पं. जसराज स्कूलची विद्यार्थिनी, जान्हवी केंडे हिचा संपर्क मिळाला. जान्हवीने आम्हाला कार्यक्रमात उत्तम साथ दिली. कार्यक्रमानंतर, तिने तिच्या गुरुजींची ओळख करून दिली. ते होते राधारमण कीर्तने. ते जसराज यांचे शिष्य.