सह्याद्रीच्या किल्ल्यांचे ‘मस्तक’ म्हणून मिरवत असलेल्या साल्हेर किल्ल्याला राज्यातील ‘सर्वात उंच किल्ला’ आणि कळसुबाईच्या खालोखाल उंची असलेले दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असा मान प्राप्त झाला आहे. किल्ल्यावर असलेले चुना न वापरता केवळ एकावर एक दगड रचून केलेले बुरूज, तटबंदी, चौथरे, पाण्याची टाकी, यज्ञकुंड, गुहा असे ऐतिहासिक अवशेष पाहणाऱ्याला अचंबित केल्याशिवाय राहत नाही...