पैठणचे शिवदीन केसरी हे, संत ज्ञानेश्वर यांच्या योगपरंपरेतील सिद्धयोगी श्रीशिवदीननाथ! शिवदीन केसरी यांच्या व्यक्तिमत्त्वात योग व भक्ती यांचा सुंदर मिलाफ आहे. शिवदीन केसरी यांच्या वाङ्मयातून नाथसंप्रदायाचे मर्म व्यक्त झाले आहे. ते योगमार्ग व भक्तिमार्ग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे सांगतात. शिवदीन केसरी यांनी त्यांचे आध्यात्मिक अनुभव त्यांच्या वाङ्मयातून, त्यांच्या तत्त्वज्ञानातून उलगडून सांगितले आहेत. गुरुभाव, निष्ठा, गुरुआदेश यांसाठी आत्मसमर्पण म्हणजेच नाथ तत्त्वज्ञान. शिवदीन केसरी यांचे वाङ्मय म्हणजे त्यांची स्वत:ची आध्यात्मिक अनुभूती व नाथतत्त्वज्ञान यांचा मिलाफ आहे. ते विविध भाषांतून प्रकट होऊ शकले; मराठी भाषेचे मर्मही त्यातून उलगडले...