Home Tags शाळा

Tag: शाळा

रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र

हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...

केळशी महालक्ष्मी मंदिर – मोगलकालीन प्रभाव(Mahalaxmi Temple at Kelshi)

रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील महालक्ष्मी मंदिराची जी इमारत आहे, तिच्यावर दाक्षिणात्य आणि मोगलकालीन कलेचा ठसा आढळतो. तेथील ध्वनीवर्धन, उगवतीच्या व मावळतीच्या सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना होणारा स्पर्श, झरी, पोळी या आगळ्यावेगळ्या गोष्टी मंदिराचे सौंदर्य वाढवतात...

बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...

अचलपूर तालुका

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ही धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली प्राचीन भूमी ! अचलपूर शहरावर मोगल, मराठा आणि निजाम अशा तिघांनी राज्य केले. पूर्वी या शहराचे नाव नौबाग होते. ती नाग देवांची जन्मभूमी, म्हणून नौबाग नाव पडले अशी आख्यायिका आहे...

मेधा पाटकर व जीवनशाळा

आदिवासी समाज हा शहरी समाजापासून दूर, आडरानात राहतो. त्यांच्याकडे नैसर्गिक संसाधने असतात. सरकारने आदिवासी भागांमध्ये शाळा काढल्या आहेत, पण तेथे मुले येत नव्हती. उलट, जीवनशाळांमध्ये मुले हौसेने येतात. त्या जीवनशाळांना मेधा पाटकर यांचे मार्गदर्शन लाभते...

नर्मदा खोऱ्यातील जीवनशाळा

मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन हे केवळ धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणे, या एका मुद्द्यापुरते सीमित नाही. या आंदोलनातील महत्त्वाची फलश्रुती म्हणजे मेधा पाटकर यांच्या व्यापक शिक्षणविषयक दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या जीवनशाळा. ‘लढाई और पढाई, साथ साथ’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या जीवनशाळा आंदोलनाचा प्राणवायू आहेत...

गोष्ट फलटणमधील दीडशे गाव-ग्रंथालयांची (Rural School Libraries to Promote Reading)

गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिद्ध करू पाहत आहे, की लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली, की मुले वाचनाला, पर्यायाने पुस्तकाला चिकटून राहतात. त्यांच्या हातात येणारी पुस्तके सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविश्वातील विषयांची असतील तर पुस्तकांशी जोडली जातात. अन त्यांना मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली, की ती कल्पनेत रमतात, व्यक्त होऊ लागतात आणि हीच किमया आहे, पुस्तकांच्या दीडशे गाव-ग्रंथालयांची…

बालरक्षक चळवळ : शिक्षणास शासनाची चालना (Balrakshak – Campaign to bring children to schools)

0
शाळा प्रगत करण्याच्या असतील तर अगोदर शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल झाले पाहिजेत, ते शाळा शाळांत टिकले पाहिजेत व शिकले पाहिजेत. लाखो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तपणे ‘बालरक्षक’ बनून कार्य केले तर मुलांना शाळा शाळांत आणण्यात मोठ्या प्रमाणावर यश येऊ शकेल...
sahvas_dance

विशेषांचे मनसोक्त जगणे! – ‘सहवास – अ केअर!’

समाधान सावंत यांची जळगावला कासोदा येथे विशेष (मतिमंद) मुलांची काळजी घेणारी ‘सहवास - अ केअर’ नावाची संस्था आहे. संस्था सुरू होऊन चार वर्षें झाली. जळगाव जिल्ह्यात विशेष (मतिमंद) मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याइतपत आहेत; त्या मुख्यत: अठरा वर्षांच्या आतील मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्था. पण खरा प्रश्न मूल अठरा वर्षांचे झाल्यानंतर काय...
shikhsan_khsmatanchi_olakh

शिक्षण म्हणजे स्वत:च्या क्षमतांची ओळख! (Education means recognizing own Abilities)

6
नानावाडा ही जुना पेशवेकालीन इमारत पुण्यात शनिवार वाड्याला लागून आहे. तेथे ‘नूतन विद्यालय’ नावाची महानगरपालिकेची पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण असणारी शाळा दुसऱ्या मजल्यावर दोन...