Tag: शकुंतला परांजपे
शकुंतला परांजपे यांची चढाओढ (Shakuntala Paranjape)
श्रीमती शकुंतला परांजपे या सई परांजपे यांच्या आई आणि रँग्लर र.पु. परांजपे यांची कन्या. शकुंतलाबाई स्वत: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या व कर्तबगार व्यक्ती होत्या. त्या गणितातील ट्रायपॉस ही परीक्षा 1929 साली उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या लंडन येथूनच डिप्लोमा इन एजुकेशन ही परीक्षादेखील पास झाल्या आणि त्या त्यांच्या वयाच्या चोविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत काम करू लागल्या. त्यांनी कुटुंब नियोजनाच्या कामाला 1938 सालापासून वाहून घेतले...