Tag: शंकर रामाणी
पद्मजा फेणाणी-जोगळेकर – जीवन-एक मैफल!
कार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते! किंवा कुणा आजारी माणसाच्या औषधोपचारासाठी पदरमोड करून धावत असते. घरात असते तेव्हा ती खाण्यावरही गाण्याइतकेच प्रेम करते! नॉनव्हेज प्रेमाने खाते! डोशावर सारस्वती पध्दतीने मध भरपूर ओतून डोसा चवीने खाते. चवीने खातात ते चवीचे जीवन जगतात हेच खरे! पद्मजाचे जीवनच एखाद्या सुग्रास मेजवानीसारखे आहे! खरे तर, तिचे जीवन ही एक मैफल आहे...