Tag: व्यक्ती
कोरोना : मलेशियात मॉल्स खुले, प्रवास खुला! (Corona in Malaysia Lockdown is Over)
मी मूळ मुलुंडची (मुंबई) आहे. माझा जन्म हुबळी येथे आणि संगोपन मुंबईमध्ये झाले. मी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य पदवी मिळवली आहे. मी मुंबईच्या लोअर परळमधील रिझलट्रिक्स पब्लिक्स इंडिया या कंपनीत काम करत होते.
कोरोना : सिंगापूर प्रशासनाचे तीन मंत्र (Corona : Strong Singapore Govt.)
सिंगापूरच्या प्रगतीला कोविद-19 ने खीळ घातली आहे. त्याचे व्यापार उद्योगावर फारच दूरगामी-निगेटिव्ह परिणाम होणार आहेत. सिंगापूर हे आशियामधील सर्वात प्रगत आर्थिक व्यवहाराचे केंद्र मानले जाते. सेवाक्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या सोयींसाठी जगातील सर्व राष्ट्रांमध्ये सिंगापूरचा क्रमांक सर्वांत वरचा आहे.
परेश केंकरे – ग्लोबल संस्कृतीचा पाईक (Paresh Kenkre’s Global Dream)
अमेरिकेतपहिल्या एक-दोन मराठी पिढ्या 1960 नंतर गेल्या, त्यांनी मराठीपण फार जपले; की ते जणू पुलं-वपु-सुधीर फडके यांच्यातच गोठून गेले आहेत असे म्हणतात! परंतु तंत्रशिक्षित तरुणांचे 1990 नंतर जे ‘ब्रेनड़्रेन’ झाले त्यांतील काही लोक नव्या जाणिवांनी संपन्न होते.
संत परंपरेचे विदेशी अभ्यासक (Foreign Scholars of the Saint Tradition )
डॉ. एलिनॉर झेलिएट या मराठी दलित संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी संत चोखामेळा व इतर दलित संत यांच्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्यत: परिश्रम घेतले. त्यांचा ‘संत चोखामेळा :विविध दर्शन’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यांना वा.ल.मंजूळ यांचे सहकार्य लाभले.
प्रज्ञा गोखले- वारीच्या लयीत दंग! (Pradnya Gokhale – On Pandharichi Wari)
मुलुंडच्या (मुंबई) प्रज्ञा गोखले यांना विठ्ठलाचे आणि वारीचे जणू वेड लागले आहे!गोखले त्या भक्तिभावनेतच दंग असतात. त्यांनी 1992-93सालापासून नित्यनेमाने आषाढी वारी केली आहे.सध्या,त्या प्रकृतीमुळे प्रत्यक्ष वारी करत नाहीत, पण त्यांच्या कार्यक्रमांतून आणि सादरीकरणांतून त्या त्यांच्या मनातील विठुमाऊलीचे दर्शन सर्वांना घडवत असतात.
कलारसिकतेची बहुविधता: संकेत-मधुरा ओक (Art and Entertainment : Dombivali’s VEDH)
मी संकेत आणि मधुरा ओक यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि मला, माझ्या गेली पंधरा-वीस वर्षें छळणाऱ्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यासारखे वाटले. ती दोघे डोंबिवली-ठाणे-कल्याण येथे वेध अॅक्टिंग अकॅडमी चालवतात. अभिनय व इतर कलाविष्कार शिकवणारे अनेक भुरटे अभ्यासक्रम, कार्यशाळा, शिबिरे यांच्याबाबत लोकांनी ऐकलेले असते.
कोरोना: रवांडा देश लहान कृती महान (Corona: Rwanda Govt. Acted Fast)
रवांडा हा मध्य आफ्रिकेतील हृदयात वसलेला छोटासा देश. जगाच्या नकाशात पाहिले तर छोटा बिंदू; पण, खरे तर, मूर्ती लहान कीर्ती महान! हे मी स्वतः अनुभवत आहे. मी मुंबईहून येथे वास्तव्यास 2015 साली आले. ‘लँड ऑफ थाउजंड हिल्स’ अशी त्या देशाची स्तुती मी ऐकून होते. तशीच प्रचिती येत आहे या देशाची.
कोरोना – जीवन पूर्ववत होईल? (Corona – England Back to normal)
आम्ही सध्या लंडनमध्य़े राहतो. माझा वाढदिवस मार्चमध्ये असतो. तो यंदा, 2020 साली तिसावा वाढदिवस होता. त्यामुळे त्याला जास्त महत्त्व होते. मी आणि माझी पत्नी वाढदिवस एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये दोन मित्रांसमवेत साजरा करायला निघालो.
निसर्गसखी आरती कुलकर्णी (Arti’s Environment Career)
आरती कुलकर्णी या पर्यावरण विषयातील पत्रकार-कार्यकर्त्या आहेत. त्यांनी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता डिजिटल मीडिया असे, पत्रकारितेतील तिन्ही टप्पे पाहिले आहेत; तसेच, त्या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीतील टप्पेही लेखनाच्या अंगाने सांगतात.
समुद्र प्रवास आणि कोरोना (Sailor Experience of Corona)
नाविक आम्ही फिरतो सात नभांखाली...बहुतेक लोकांना असे वाटते, की नाविक व्यक्तींचे जीवन मनमोहक असेल, त्यांना भरपूर जगभर फिरण्यास, भरपूर वाइन पिण्यास मिळत असेल आणि त्यासोबत पैसेही कमावता येत असतील! पण जसे म्हणतात, ना 'अज्ञानात आनंद आहे' तसेच हेही आहे