'ग्रंथाली'मधून निर्माण झालेल्या आमच्या विशाल स्नेही मंडळात जयंत खेर हा वेगळा होता. तो स्टेट बँकेत उच्चाधिकारी होता. ती नोकरी सोडून तो खाजगी कंपनीत गेला. त्याचे वागणे-बोलणे शिस्तशीर, नेमस्त, तरी आग्रही असे.
दादरचे ज्येष्ठ कन्सल्टिंग पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर अविनाश वैद्य अभ्यासू व संशोधक वृत्तीचे गृहस्थ आहेत. त्यांचे मलेरियावरील पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यास 'मराठी विज्ञान परिषदे'चा पुरस्कार मिळाला, त्यासही आठ वर्षे होऊन गेली. मला ते नावाने परिचित होते.
सदानंद डबीर हे आजच्या काळातले मराठीतील महत्त्वाचे गझलकार मानले जातात. माझा-त्यांचा त्यांच्या पहिल्या 'लहेरा' संग्रहापासूनचा परिचय. ते त्यावेळी रेल्वेत इंजिनीयर म्हणून नोकरी करत होते. परंतु कविता, विशेषत: गझल हे त्यांचे वेड वाढत गेले.
अमित आणि अपर्णा वाईकर चीनमध्ये शांघाय येथे गेली दहा वर्षे राहत आहेत. अमित एका मोठ्या कंपनीत सिनियर व्हाइस प्रेसिडेंट आहेत, पण त्याहून त्यांचे महाराष्ट्राच्या-मराठीच्या दृष्टीने वैशिष्ट्य म्हणजे त्या दांपत्यास त्यांच्या मातृभूमीबद्दल असलेली आस्था.
संपादक-लेखक अरुण टिकेकर मनाने, विचाराने एकोणिसाव्या शतकात राहत. पत्रकार-लेखक अशोक जैन त्याला म्हणे, की अमिताभ बच्चन, दत्ता सामंत यांच्यासारखे 'फिनॉमिनन' एकोणिसाव्या शतकात झाले असते तरच तू त्यांच्याकडे लक्ष दिले असतेस!
राजुल वासा यांच्याकडे अशी विशिष्ट विद्या (concept) आहे, की जिचा उपयोग सर्वत्र झाला तर मेंदुबाधित आजाराचा रुग्ण जगामध्ये एकही राहणार नाही! म्हणजे सर्वच्या सर्व बरे होतील. असे आजार कोणते? तर सेरिब्रल पाल्सी मुले आणि पक्षाघाताने जायबंदी झालेले प्रौढ.
दीपक घारे हे चित्रकार सुहास बहुळकर यांना त्यांच्या लेखन-संशोधन कार्यात हक्काचे व प्रेमाचे साथीदार लाभले आहेत. खरे तर, घारे हे स्वयंप्रज्ञेचे लेखक-चित्रकार.
सुहास बहुळकर हे उत्तम व्यक्तिचित्रकार म्हणून विख्यात आहेत; तसेच संशोधक-लेखक म्हणूनही. त्यांचा हे करावे, की ते असा पेच गेली दोन-तीन दशके चालू होताच; तो कामाच्या दडपणाखाली आपोआप सुटला आणि ते संशोधन-लेखनाच्या नादी गेली काही वर्षे लागले ते लागलेच...
नागपूरचेभवानीशंकर पाटणकर पंच्याण्णव वर्षांचे आहेत. ते सजग वृत्तीने लेखन-संभाषण करत असतात. मुळात त्यांना समकालीन प्रश्नांबद्दल विलक्षण जागरूकता आहे. तसे लेखन त्यांना 'साधना' या, पुण्याच्या साने गुरुजींनी सुरू केलेल्या साप्ताहिकात आढळते.
पुण्याचा सौमित्र आठवले पुण्याच्याच आयसरमधून बीएसएमएस (म्हणजे एम एस्सी) होऊन अमेरिकेतीलशिकागोजवळ अर्बाना शँपेन येथील विद्यापीठात(युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय) रसायनशास्त्रात पीएच डी करण्यास गेला.