महाराष्ट्र राज्य स्थापना दिन यावर्षी साजरा होऊ शकला नाही. उपचार म्हणून झेंडावंदनासारखे कार्यक्रम झाले. खरे तर, या वर्षी महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठ वर्षे झाली. सर्व लोक लॉकडाऊनमुळे घरातच बंदिस्त आहेत. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट आणि कॉम्प्युटर यांचा उपयोग वाढला आहे. काही संस्थानी त्या तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षात काही उपक्रम नव्याने सुरू केले.