रेखा बागूल या कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षणाकडे अपघाताने वळल्या, पण हळूहळू त्यांच्या कामाचे महत्त्व इतके वाढत गेले, की त्यांचे काम फक्त कर्णबधिरांपर्यंत मर्यादित न राहता गतिमंद आणि त्याही पुढे जाऊन बहुविकलांग मुलांपर्यंत पोचले आहे. त्या सुरुवातीला डोंबिवलीत आणि, आता दापोलीत ‘गतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र’ ही निवासी शाळा चालवत आहेत. ‘आनंद फाउंडेशन ही त्यांची मूळ संस्था आहे. त्यांचे काम अन्य संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने वृद्ध निवासापर्यंत पोचले आहे...