Tag: वृद्धावस्था
वृद्धाश्रमी… – स्वाभाविक, अपरिहार्य जीवनावस्था
माणसे वृद्धत्वाकडे सरकू लागतात तेव्हा त्यांना अनेक धक्के बसू लागतात. आयुष्याच्या संध्याकाळी अधिक भय वाटते ते मृत्यूचे आणि परावलंबित्वाचे. वार्धक्य म्हणजे दुसरे बालपण. शरीराच्या अवयवांची शक्ती मंदावत जाते, रिकामपण खाण्यास उठते. त्यातून नैराश्य येऊ लागते. व्यक्तीचे सामाजिक व कौटुंबिक जीवन हेदेखील सामूहिक न राहता वैयक्तिक बनले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य दीनवाणे झाले आहे. पण वृद्धत्व हे स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे. त्यामुळे ते तशाच पूर्वतयारीने स्वीकारले पाहिजे. ही तयारी मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर असते. शारीरिक हालचाली मंदावत जात असतात. त्यासाठी आवश्यक तो व्यायाम, आहार आणि औषधे घ्यावी लागतात; तर मानसिक पातळीवर वृद्धांना सहवास आणि प्रेम यांची गरज असते...