चौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अतिप्राचीन बंदर. त्याचा उल्लेख चिम्युला, टिम्युला, साइभोर, चेऊल अशा विविध नावांनी इतिहासात आढळतो. चौलचा उल्लेख घारापुरीच्या लेण्यातील शिलालेखातदेखील आढळतो. चौल बंदरात 1470 साली आलेल्या रशियन दर्यावर्दीचे नाव – अफनासी निकीतीन...