सतीश चाफेकर यांनी डोंबिवलीमधील टिळकनगरमध्ये ब्लॉक 2002 मध्ये घेतला. त्यावेळी त्यांचे चित्रकार मित्र अमोल सराफ यांना ते म्हणाले माझ्याकडे खूप स्वाक्षऱ्या आहेत. त्यातील काही भिंतीवर काढशील का? ते एके दिवशी रंग, ब्रश घेऊन आला आणि त्यांनी त्या स्वाक्षऱ्या जवळ जवळ पस्तीस तासांत त्यांच्या घराच्या भिंतींवर अप्रतिमपणे रेखाटल्या. त्यावेळी बाजूच्या शाळेत वसंत गोवारीकर हे वैज्ञानिक आले होते. मोघेसर यांना विचारले, डॉक्टर घरी स्वाक्षरी करण्यासाठी येतील का? त्यांनी त्यांना विचारले आणि ते आले ! ती पहिली स्वाक्षरी माझ्या घराच्या भिंतीवर झाली. तेव्हापासून एकशेसाठच्यावर सेलिब्रिटींनी स्वतः माझ्या घरी येऊन भिंतींवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ते भारतातील पहिले असे घर आहे, म्हणून त्या घराची 2016 मध्ये ‘लिम्का रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. तेव्हापासून त्यांचे सहा ‘लिम्का रेकॉर्ड’ झाले...