हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये जी लोकोत्तर स्त्रीरत्ने प्रकाशमान झाली त्या सर्वांमध्ये शेवटचे व शौर्यगुणामध्ये अग्रेसर असे स्त्रीरत्न म्हणजे झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब होत. पारसनीस यांनी झाशीच्या राणीसंबंधीची बारीकसारीक माहिती सोन्याच्या खाणीत काम करणारा माणूस क्षणोक्षणी, कणाकणाने सोने टिपतो तशी गोळा केली. ती प्रचंड कष्टाने जमवलेली माहिती त्यांनी कल्पकतेने लिहून काढली. त्या बाबतीत पारसनीस यांना प्रतिभेची भरभरून अशी देणगी मिळाली होती...