आचरे गावातील रामनवमी उत्सवात, पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या महाराष्ट्रातील ख्यातकीर्त सत्तर कलावंतांचा चाळीस वर्षांपूर्वी, 1975ला आचरेवासीयांना जो सुखद सहवास लाभला तो आम्ही समस्त आचरेवासीय आजन्म विसरू शकत नाही. ‘कलासक्त हे गुणीजन मंडित पुण्यग्राम आचरे’ ही विद्याधर करंदीकर यांच्या कवितेतील ओळ खऱ्या अर्थाने आचरे गावात साकार झाली. ते दिवस समस्त आचरेवासीयांसाठी स्वर्गीयच...