यावर्षी पावसाने कृपा केली आहे. येणाऱ्या सुगीचे स्वप्न पहायला हरकत नाही असा माहोल आहे. ढग दाटून आले आहेत आणि पावसाच्या धारा कोसळत आहेत. या कोसळणाऱ्या धारांचे संगीत म्हणजे राग मल्हार. त्यात पावसाचे सगळे विभ्रम साठलेले आहेत. भीमसेन जोशींचा मल्हार ऐकताना गडगडणाऱ्या ढगांची आणि कोसळणाऱ्या धारांची आठवण येते. मोगरा फुलला या सदरामध्ये सौमित्र कुलकर्णी मल्हार रागाचा परिचय करून देत आहेत. रागाचे स्वरूप स्पष्ट व्हावे आणि अलौकिक गाण्याचा आनंदही मिळावा या दृष्टीने त्यांनी युट्यूब लिंक्स सोबत दिल्या आहेत. अभिजात व आधुनिक संगीताचा मेळ घालून सादर केलेली 'मल्हार जॅम' ही त्यातील एक आगळीवेगळी प्रस्तुती. स्वत: सौमित्र कुलकर्णी यांनीही एक बंदीश गायली आहे. मल्हाराच्या या धारा खचितच आनंददायी ठरतील...