Tag: लेखसूची
कोरोनावर मात प्राणायामाने! (Pranayam Helps Resist Corona)
कोरोना माणसाच्या श्वसनक्रियेवर आघात करतो. भारतीय योग दर्शनातील प्राणायामाचा पाया श्वासोच्छवासाचे नियंत्रण यावर आधारित आहे. योगशास्त्रास जगभर मान्यता गेल्या काही दशकांत मिळू लागली होती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर योगाचा झेंडा युनोवर फडकला!
जन्मशताब्दी साजरी होत असलेल्या व्यक्ती (Janmashatabdi Sajari Hot Asalelya Vyakti)
मी, माझा सहकारी राजेंद्र शिंदे आणि विनय नेवाळकर, आम्ही त्या तिघांच्या जन्मशताब्दीचा विचार करताना वेगळीच कल्पना लढवली. गेल्या शतकातील व या शतकाच्या पहिल्या काही दशकांत सामाजिक-सांस्कृतिक जीवन घडले गेले ते ढोबळपणे 1900 ते 1930 या काळात जन्मलेल्या महनीय व्यक्तींच्या संस्कारांतून. त्यांच्याच जन्माची शंभर वर्षे विद्यमान ज्येष्ठ जनांना महत्त्वाची वाटत आहेत व तो वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जावा असेही वाटत आहे.
झाडांची दुनिया (Dr. Ravin Thatte)
तत्त्वचिंतक डॉ.रविन थत्ते हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. ते ज्ञानेश्वरीवरील श्रद्धा समजू शकतात, ज्ञानेश्वरीतील कवित्व जाणतात आणि त्यातील तत्त्वचिंतन व त्याचा व्यवहारोपयोग समजावून सांगतात. त्यांची तशी भली पुस्तके आहेत.
इतिहासजमा इमारती (Historical Buildings)
प्रकाश पेठेहे बडोद्याचे आर्किटेक्ट बडे उपक्रमशील आणि हौशी आहेत. ते सतत कशाच्या तरी शोधात असतात. त्यांनी मुख्यतः आर्किटेक्चर या विषयासंदर्भात, त्याचे वेगवेगळे पैलू पकडून सहा पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे लेखन खूप हिंडूनफिरून होते व ते तसेच कागदावर उतरते. ते तितकेच फोटो काढतात.
शेतकऱ्यांच्या पायांत कायद्याच्या बेड्या…!
जनतेने मुळात समजून घेतले पाहिजे, की घटना आणि कायदे हे शासकीय लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा यांना नियंत्रण करण्यासाठी आहेत; नागरिकांना नियंत्रित करण्यासाठी नाहीत. मात्र सामाजिक स्वास्थ्य टिकून राहवे म्हणून जे कायदे-नियम आहेत ते जरूर नागरिकांसाठी आहेत.