शेखर भागवत मुंबईचा स्ट्रक्चरल इंजिनीयर शेखर भागवत हा हरहुन्नरी, निसर्गप्रेमी आहे. तो आयआयटीत शिकत असताना पक्षीनिरीक्षण, निसर्गात भटकंती यांचे वेड त्याला लागले. त्याने तेव्हाच ठरवले, की वयाच्या पन्नाशीच्या आसपास व्यवसाय-नोकरी सोडून छंद आणि हौशी जोपासत जगायचे.