समाजकार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे संकेतस्थळ मंगळवारी, ८ जुलैला खुले झाले. हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने जन्मशताब्दीवीरांच्या प्रकल्पांतर्गत तयार केले आहे. वेबसाइटचे लेखन ललिता घोटीकर यांनी केले आहे आणि संपादन गिरीश घाटे यांनी. नानाजी देशमुख यांचे मूळ नाव चंडिकादास अमृतराव देशमुख. त्यांचा सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून मोठा लौकिक होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या तीन क्षेत्रांत मुख्यत: काम केले...