Tag: राष्ट्रनेता
टिळक-गांधी आणि त्यांचा निर्भयतेचा वारसा
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांचा वारसा महत्त्वाचा आहे. लोकमान्यांनी स्वतंत्र देशात जगण्याचा लोकांना अधिकार आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवून देशाचे स्वातंत्र्य हे महत्त्वाचे मूल्य प्रस्थापित केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांचा आग्रह हा देशाच्या भावी घटनात्मक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग ठरला. गांधीजींनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यासाठी स्वावलंबन यांचा पुरस्कार केला. गांधीजींचा दुसरा मूल्यसंस्कार हा समतेचा आहे. गांधीजींचा आग्रह धर्म हा लोकांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक व्यवहारातून बाजूला ठेवावा हा होता...